Summer Skin Care: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या उन्हात त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या निर्माण होतात. खास करून नाजूक त्वचा असलेल्यांसाठी उन्हाळा खूपच त्रासदायक असतो. अनेकांचा चेहरा उन्हाने लाल होतो. अनेकदा सनबर्न किंना एलर्जीमुळे देखील हा लालपणा येतो. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला दोन उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा मुलायम आणि चमकदार बनवू शकता. चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

प्रत्येकाला तरुण आणि सुंदर दिसायचे असते. यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. मात्र अनेक प्रयत्न करूनही लोकांच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दूर होत नाहीत. अनेक वेळा हा चिंतेचा विषय बनतो.

या दोन गोष्टी वापरा

जर तुम्हालाही चेहऱ्यावरील डागांमुळे त्रास होत असेल तर या दोन गोष्टींचा अवश्य वापर करा. नारळ तेल आणि कोरफड. नारळाच्या तेलात मॉइश्चरायझिंग आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेला हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. एलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतात.

फेस मास्कचा वापर

तुम्ही खोबरेल तेल आणि कोरफड वेरा जेलने फेस मास्क बनवू शकता, यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा एलोवेरा जेल चांगले मिक्स करावे लागेल, त्यानंतर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.

हेही वाचा >> जादू की झप्पी गरजेची; मिठी मारल्याने खरंच तणाव कमी होतो? काय आहे ‘टच थेरपी’? जाणून घ्या फायदे

फेसक्रीम

याशिवाय तुम्ही यापासून क्रीमही बनवू शकता. यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल गरम करून त्यात एलोवेरा जेल टाका आणि मंद आचेवर २० मिनिटे शिजवा, जेव्हा कोरफड काळी पडू लागते तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. काही लोकांना खोबरेल तेल किंवा कोरफडीची ऍलर्जी असू शकते, त्यामुळे फेस मास्क वापरताना चेहऱ्यावर जळजळ किंवा लाल पुरळ उठत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.