Cooler Cleaning Tips : अनेकांच्या घरात हल्ली फॅनसह एसी व कूलरचाही वापर केला जातो. विशेषत: उन्हाळ्यात महागड्या एसीपेक्षा अनेक जण कूलरचा वापर करतात. कूलरमधून एसीसारखीच थंड हवा येत असल्याने खोली थंड राहण्यास मदत होते. त्यामुळे वीज बिलही कमी येते; पण कूलरची सर्वांत मोठी अडचण म्हणजे त्यात दररोज पाणी भरावे लागते. कूलरमध्ये असलेल्या या पाण्यामुळे तो सतत घाण होतो; ज्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कूलरमधील पाणी दोन दिवसांनी पिवळे दिसू लागले. कधी कधी या पाण्याला दुर्गंधीही येऊ लागते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला कूलर स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत; ज्याच्या मदतीने तुम्ही कूलरमधील घाणेरडे पाणी, दुर्गंधी दूर करू शकता.
कूलरमधील गवत स्वच्छ ठेवा
दर दोन दिवसांनी कूलरमधील पाणी पिवळे वा खराब होण्यामागील कारण त्यातील गवत असू शकते. कूलरमधून थंड हवा मिळावी म्हणून तिन्ही बाजूंनी गवत लावले जाते. कूलर चालू झाल्यावर पाणी गवतातून जाऊन परत अगोदरच्याच पाण्यात मिसळते. त्यादरम्यान गवतावर साचलेली घाण पाण्यात मिसळते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कूलरचे पाणी स्वच्छ ठेवायचे असेल, तर गवत चांगले स्वच्छ करा. कारण- गवत स्वच्छ असेल, तर कूलरमधील पाणीही स्वच्छ होईल.
कूलर व्यवस्थित स्वच्छ करा
कूलरमधील पाणी लवकर खराब होण्याचे कारण त्यातील घाणही असू शकते. कूलरची नीट साफसफाई न केल्यास, त्याचा पंखा किंवा पानांवर घाण साचते. अशा परिस्थितीत कूलर चालू असताना धूळ हवेबरोबर उडून पाण्यात मिसळते. त्यामुळे कूलर योग्य प्रकारे स्वच्छ करणे गरजेचे आहे. जर तुम्ही दर काही दिवसांनी कूलर स्वच्छ करीत राहिल्यास कूलरमधील पाणी खराब होणार नाही.
अनेक वेळा लोक कूलर स्वच्छ करताना आळशीपणा करतात. त्यामुळे कूलरमधील पाणी नीट स्वच्छ होत नाही. कूलरमध्ये थोडे पाणी शिल्लक असतानाच त्यात पुन्हा अधिक पाणी टाकले जाते. खराब पाण्यात पुन्हा पाणी मिसळल्यामुळे मग ते सर्व पाणी खराब झाल्याचे दिसू लागते. त्यामुळे कूलरमधील पाणी लवकर खराब झाल्याचे दिसू नये, असे वाटत असेल तर ही चूक करू नका.
अशा प्रकारे काढा कूलरमधील पाणी
जर कूलरमधून पाणी काढण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही पाइपची मदत घेऊ शकता. त्यासाठी सर्वप्रथम कूलर बंद करून, एका बाजूचे झाकण काढा. आता कूलरच्या मधोमध पंपाला जोडलेला पाइप वरून काढून टाका. पण, पाइप तळाशी असलेल्या पंपाशी जोडलेला असावा. त्यानंतर कूलरखाली बादली ठेवा आणि पाइप बादलीत टाका. आता कूलर चालू करा, बादलीत पाणी येऊ लागेल. थोड्याच वेळात कूलर रिकामा होईल. त्यानंतर कूलर पूर्णपणे साफ केल्यावर पुन्हा पाण्याने भरा.