Premium

Haircare tips: लांब केस हवेत? मग केळीच्या सालीचे पाणी ठरेल केसांसाठी उपयोगी

Haircare tips: चेहऱ्यावर चोळली तर आपली त्वचा चांगली होते. फक्त हेच नाहीतर केळीच्या सालीचं केसांमध्ये पाणी लावल्याने केसांना चमक येते.

banana peel water benefits for hair
केळीच्या सालीचे पाणी केसांसाठी प्रचंड उपयोगी

केळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या सर्वांना केळीच्या फायद्याबद्दल माहिती आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, केळीची साल सुध्दा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीचा साल आपल्या चेहऱ्यावर चोळली तर आपली त्वचा चांगली होते. फक्त हेच नाहीतर केळीच्या सालीचं केसांमध्ये पाणी लावल्याने केसांना चमक येते. यासोबतच केळीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे आपल्या केसांना इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. केसांमध्ये या पाण्याचा वापर केल्याने कोंडा, खाज सुटणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया केळीच्या सालीचे पाणी कसे बनवावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केळीच्या सालीचे पाणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य

 • केळीची साल 2
 • पाणी 3 कप

केळीच्या सालीचे पाणी कसे बनवावे?

 • केळीच्या सालीचे पाणी बनवण्यासाठी प्रथम १ कढई घ्यावी.
 • मग त्यात पाणी घालून अर्धे होईपर्यंत उकळावे.
 • यानंतर गॅस बंद करून पाणी कोमट होऊ द्यावे.
 • नंतर त्यात २ केळीची साल घालून रात्रभर भिजवून ठेवा.
 • यानंतर हे पाणी सकाळी एकदा मिसळून स्प्रे बाटलीत भरून घ्यावे.
 • आता लांब केसांसाठी केळीच्या सालीचे पाणी तयार आहे.
 • केळीच्या सालीचे पाणी केसांना कसे लावावे?
 • केळीच्या सालीचे पाणी तुम्ही केसांमध्ये कंडिशनर म्हणून लावू शकता.
 • हवं असेल तर केसांमध्ये स्प्रे करून थोडा वेळ सोडा.
 • यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवावेत.
 • मग तुम्ही केसांचे अतिरिक्त पाणी पिळून घ्या आणि तुम्ही बनवलेले सालाचे पाणी लावा.
 • यानंतर हे पाणी केसांमध्ये सुमारे 20 मिनिटे राहू द्या.
 • त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस धुवून स्वच्छ करावेत.

हेही वाचा – Anger Issues: तुम्हालाही पटकन राग येतो का? रागावर कंट्रोल करण्यासाठी हे ७ उपाय आहेत फायदेशीर

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Banana water beneficial for healthy long hair know how to make it at home srk

First published on: 05-05-2023 at 13:13 IST
Next Story
ओठावर किस केल्याने ‘हे’ आजार वेगाने वाढू शकतात; दात- ओठांवर नेमका कसा दिसतो प्रभाव?