-पल्लवी सावंत पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आई , व्हॉट्स दॅट? जे अॅक्च्युअली दिसतं नारळासारखं पण खूप डेलिकेट वाटतं. म्हणजे लिची प्लस फ्रेश कोकोनट. सिया आईला विचारात होती. ‘लिची प्लस कोकोनट? तू खाऊन पाहिलास का? कुठे खाल्लंस’? श्वेता विचारात पडली.

‘नाही मी येताना पाहिलं एका गाडीवर. म्हणजे बर्फासारख दिसतं. पर्ल व्हाईट कलर – हार्ट शेप्ड. ते खातात का’? सिया शक्य तितकं वर्णन करायचा प्रयत्न करत होती. त्यावर मी आणि श्वेता आम्ही दोघीजणी एकासुरात ‘ताडगोळा’ असं म्हणालो.

मी पटकन तिला आईस अॅपल म्हणजेच ताडगोळ्याचा फोटो दाखवला आणि सिया हो हो सेम असं आनंदाने ओरडलीच. पुण्यात राहत असल्यामुळे तिने मुंबईत आल्यावर पहिल्यांदाच हे फळ पाहिलं होतं आणि हे नक्की काय असावं असा विचार तिला पडला होता. उन्हाळ्याची चाहूल लागली कि मुंबईत रस्त्यारस्त्यावर सहज दिसणारं फळ म्हणजे ताडगोळा.

आणखी वाचा-Health Special : कडधान्यं का खावीत आणि खाताना काय काळजी घ्यावी? 

वरून टणक तांबडं किंवा हिरवं कवच आणि आत धुकेरी पांढऱ्या रंगाचा लुसलुशीत ताडगोळा. त्याच्याही आत थोडंसं गोड किंवा तुरट पाणी जे नारळपाणीच असतं. पण अगदीच चवीपुरतं!

उन्हाळ्यात थकवा येत असेल किंवा चालून झाल्यावर कमी कॅलरीज आणि उत्तम ऊर्जा हवी असेल तर २ ताडगोळे खाऊन तुम्ही आणखी ३ किलोमीटर अंतर उत्तम चालू शकता.

ताडगोळा खरं तर जीवनसत्व आणि खनिजांनी युक्त असं फळ आहे. ताडगोळ्याला इंग्रजीमध्ये आईस ॲपल असे म्हणले जाते. किमान २ ताडगोळ्यांमध्ये १०० कॅलरीज इतकी ऊर्जा असते आणि मुख्यत्वे ही ऊर्जा त्यात असणाऱ्या कर्बोदकांमुळे आहे. यात असणाऱ्या २५ ग्राम कर्बोदकांसोबत ३ ग्राम तंतुमय पदार्थ देखील असतात.

आणखी वाचा-Health Special: विविध डाळींचा वापर पोषकतत्त्वांसाठी कसा करावा? 

ताडगोळा खाल्ल्याने होणारे फायदे –

१. थकवा आल्यास शरीराला पटकन ऊर्जा पुरवतं

२. रक्तदाब कमी करतं

३. रोगप्रतिकारशक्ती वाढवतं

४. गरोदर स्त्रियांमध्ये अपचन कमी करतं

५, मलावरोध कमी करतं

६. आतड्याचे विकार कमी होतात

७. पोटाचे विकार कमी करतं

८. स्तनाच्या कर्करोगापासून रक्षण करतं

९. मुरुमे कमी करतं

१०. त्वचेची आर्द्रता सुधारतं

ज्यांना दमा किंवा सर्दी खोकला आहे त्यांनी मात्र ताडगोळे खाणे टाळावे. शिवाय ताडगोळा खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिणे टाळावे. विशेषतः गरोदर स्त्रियांमध्ये ताडगोळा खाल्ल्यामुळे जळजळ होणे, अॅसिडिटी होणे यासारखे विकार कमी होऊ शकतात. कुटुंबामध्ये हृदयविकार असणाऱ्यांनी ताडगोळा आवर्जून आहारात समाविष्ट करावा. हृदयाच्या आरोग्यासाठी ताडगोळा गुणकारी फळ आहे. ज्यांना उन्हामुळे त्रास होतो किंवा उष्माघाताचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे ताडगोळा खावा.

आणखी वाचा-Health Special: प्रेमाचं प्रतीक असलेल्या गुलाबाचे प्रकृतीसाठी फायदे तुम्हाला माहिती आहेत का? 

अनेक ठिकाणी ताडगोळ्यातलं पाणी नीरा म्हणून वापरले जाते. आणि सकाळी उठल्यावर हे पाणी प्यायल्यास अंगयष्टी काटक राहते. ग्लायसेमिक लोड कमी असणारा ताडगोळा मधुमेह असणाऱ्यांसाठी देखील उपयुक्त आहे.

अनेक ठिकाणी ताडगोळ्याचे आईस्क्रीम तयार केले जाते. ताडगोळ्यांसोबत बर्फ किंवा दूध एकत्र केल्यास हे मिश्रण विषारी मानले जाते. त्यामुळे ताडगोळा नुसता खाणे कधीही उत्तम. त्याचा मिल्कशेक किंवा तत्सम पदार्थ करुन खाऊ नये. वेगळी चव आणि केवळ उन्हाळ्यात उपलब्ध असणारा ताडगोळा शरीरासाठी उत्तम फळ आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी ताडगोळा खावा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of eating tadgola or ice apple hldc mrj