Premium

Diet tips : तुमच्या यकृताची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल

यकृत हा मानवी शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. यकृताची काळजी घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहेत.

Diet tips lifestyle changes for liver health
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या शरीराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे ( Freepik)

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या शरीराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषत: तुमच्या यकृताची. यकृत तुमच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे, जो विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि तुमचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी जबाबदार असतो. पण चुकीचा आहार आणि जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे तुमचे यकृत खराब होत असते. परिणामी त्याचा आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतो. पण योग्य आहाराद्वारे आपण यकृत खराब होण्याचा धोका कमी करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉन्शियस फूडमधील इन-हाउस न्यूट्रिशनिस्ट सलोनी झवेरी यांनी एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या माहितीनुसार, “अनेक नैसर्गिक उपाय यकृताच्या कार्याला चालना देऊ शकतात.”

मिल्क थिस्टल – मिल्क थिस्टल ही सिलीमारिन नावाचे फ्लेव्होनॉइड कॉम्प्लेक्स असलेली एक औषधी वनस्पती, त्यात अँटिऑक्सिडंट आणि दाहविरोधी गुणधर्म आहेत, जे यकृताचे संरक्षण करू शकतात.

हळद – हळद, कर्क्युमिनयुक्त मसाला यांमुळे विषारी पदार्थांमुळे होणारे यकृताचे नुकसान टळू शकते आणि यकृताचे कार्य वाढू शकते.

ग्रीन टी – ग्रीन टीमध्ये कॅटेचिन, संयुगे असतात ज्यांत दाहविरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि यकृताला विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचविण्यास मदत करतात.

लसूण – लसूण, ज्यामध्ये अ‍ॅलिसिन असते, त्यात अँटिऑक्सिडंट आणि दाहविरोधी गुणधर्म असतात जे यकृताला विषारी पदार्थांपासून वाचवतात आणि यकृताचे कार्य सुधारते.

बीट – बीट, ज्यामध्ये बीटेन असते. हे एक संयुग आहे जे यकृताला विषारी पदार्थांपासून वाचवू शकते आणि यकृताचे कार्य सुधारू शकते.

“या नैसर्गिक उपायांचा तुमच्या आहारात समावेश करण्यासोबतच, यकृताच्या कार्याला चालना देण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे. यामध्ये संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे आणि तणावाची पातळी नियंत्रित करणे समाविष्ट आहे. तुम्हाला यकृताचा आजार असल्यास किंवा तुम्हाला यकृतात बिघाड झाल्याची शंका असल्यास, योग्य निदान आणि उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे,” असेही डॉ. झवेरी यांनी या वेळी स्पष्ट केले.

याबाबत आत्मांतन वेलनेस सेंटरचे सीईओ आणि वैद्यकीय संचालक डॉ. मनोज कुटेरी सांगतात की, “यकृताची काळजी घेणे हा एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा निर्धारक घटक आहे. बहुतेक डिटॉक्स प्रोग्राम यकृत साफ करण्यावर लक्ष केंद्रित करतात. यकृत हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे जो हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि त्याचे चयापचय करण्यास मदत करतो. डिटॉक्सिफिकेशन (विषारी पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया) हे यकृताचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे आणि ते पर्यावरणीय विष आणि विविध औषधे यांसारख्या विषाचे रूपांतर कमी हानिकारक पदार्थांमध्ये करतात, जे नंतर आपल्या शरीरातून काढून टाकले जाऊ शकतात. निरोगी यकृत पोषक तत्त्वांच्या चयापचयात, विविध एन्झाइम्स तयार करून चरबीचे पचन आणि आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण पोषक घटकांच्या साठवणीतदेखील मोठे योगदान देते. आपली रोगप्रतिकारक कार्ये सुधारण्यात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात यकृताची मोठी भूमिका असते. जेव्हा यकृताचे कार्य बिघडते तेव्हा फॅटी लिव्हरसारखे अनेक विकार होऊ शकतात.”

हेही वाचा – ह्रदय विकार टाळण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा हे ५ बदल

यकृताची काळजी घेण्यासाठी त्यांनी खाली काही उपाय सुचविले आहेत

ओमेगा-६ चे सेवन कमी करा आणि ओमेगा-३ चे सेवन वाढवा

ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड हे एक प्रकारचे पॉलीअन्सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आहे, जे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, परंतु ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. परिष्कृत आणि प्रक्रिया केलेल्या तेलांमधून भरपूर ओमेगा-६ फॅट्सचे सेवन केल्यामुळे यकृतावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. ओमेगा-६ फॅट्सचे जास्त सेवन केल्याने यकृताची जळजळ होऊ शकते, ज्यामुळे यकृताचे कार्य बिघडू शकते. ओमेगा-३ फॅट्स, जसे की चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स, फॅटी फिश इ. जळजळ कमी करण्यास मदत करतात.

नियमित व्यायाम करा
व्यायाम न करण्यामुळे यकृत आणि ओटीपोटाच्या अवयवांमध्ये अ‍ॅडिपोज टिश्यू जमा होऊ शकतात, ज्यामुळे विषारी पदार्थ साठतात आणि वजन वाढते. ओटीपोटातील किंवा यकृतावरील जास्त चरबीच्या पातळीमुळे अ‍ॅडिपोज टिश्यू जमा होतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे यकृताची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – आता तरी ब्रेक घ्या! ‘या’ पेक्षा जास्त वेळ फोनवर बोलण्याची चूक करू नका; उच्च रक्तदाबासाठी ठरू शकते कारण

कमी कार्ब, मध्यम चरबीयुक्त आणि उच्च प्रथिनेयुक्त आहार घ्या
आहारात कमी कार्ब, मध्यम चरबीयुक्त आणि उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. एका वेळी जास्त प्रमाणात कार्ब सेवन केल्याने जास्त प्रमाणातील कार्बोहायड्रेट्सचे चरबीमध्ये रूपांतर होते.

पुरेशा प्री-बायोटिक्सचे सेवन करा
प्री-बायोटिक्स पित्ताम्लाचे उत्सर्जन वाढवतात आणि त्यामुळे यकृताकडे पित्त परत येण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होईल आणि यकृतातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होईल.

दारू पिणे टाळा
जास्त प्रमाणात मद्यपान हे यकृताच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे. यकृत हे डिटॉक्सिफायर म्हणून काम करते आणि अल्कोहोल आणि इतर औषधांमधील विषारी पदार्थ काढून टाकते. जेव्हा या विषारी पेयांचे सेवन यकृताच्या मर्यादेपलीकडे असते, तेव्हा गुंतागुंत टाळण्यास यंत्रणा अपयशी ठरते. आपण या सवयीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असताना पेयाचे प्रमाण, वारंवारता, प्रकार इत्यादी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

व्हिटॅमिन सीने समृद्ध अन्न किंवा अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन करा
व्हिटॅमिन सी हे एक उत्तम अँटिऑक्सिडंट आहे जे आपल्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळण्यास मदत करते. ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळण्याव्यतिरिक्त, ते यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून रोखण्यासदेखील मदत करते

पुरेशी झोप घ्या
झोपेचे विकार, जसे की निद्रानाश, स्लीप अ‍ॅपनिया, जास्त झोपणे किंवा कमी झोप इ. यकृताच्या जुनाट आजारांशी निगडित आहेत. दररोज रात्री ६-८ तासांची अखंड झोप घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात पचनसमस्या, त्वचेत बदल, विषारी पदार्थांचा वाढता साठा आणि खराब यकृत डिटॉक्सिफिकेशन यासह मोठ्या समस्या उद्भवू शकतात.

पुरेसे पाणी प्या
यकृत हा विषारी पदार्थ बाहेर टाकणारा एक गंभीर अवयव असून पुरेसे पाणी पिणे यकृताला विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी प्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Diet tips lifestyle changes for liver health snk

First published on: 08-05-2023 at 16:24 IST
Next Story
World Thalassemia Day 2023 : रक्तासंबंधीत ‘थॅलेसेमिया’ आजार किती धोकादायक आहे? कशी काळजी घ्याल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या