Premium

हृदय विकार टाळण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा हे ५ बदल

अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे आणि निरोगी जीवन जगणे तुम्हाला हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारा(CVD)चा धोका कमी करण्यात मदत करू शकते.

Heart Diseases
ह्रदय विकार टाळण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा हे ५ बदल ( Freepik)

जागतिक आरोग्य संघटनेने असा दाव केला आहे की, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग (CVDs) हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. एवढेच नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा असा अंदाज आहे की, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार (CVD) यात दरवर्षी सुमारे १७.९ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू होतो आणि पाचपैकी चार CVD मृत्यू हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे होतात. याव्यतिरिक्त, यापैकी सुमारे एकतृतीयांश मृत्यू ७० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचे होतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकता? हो हे खरे आहे. अमेरिकेच्या रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून आणि निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करणे तुम्हाला CVD चा धोका कमी करण्यात मदत करू शकते. ते बदल काय आहेत असा तु्म्हाला प्रश्न पडला असेल. मुळात, तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्याची गरज आहे आणि आपण आपल्या जीवनात या पर्यायांचा समावेश करून असे करू शकता :-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वजन प्रमाणात राखणे
रोगनियंत्रण आणि प्रतिबंधासाठी केंद्राचा (CDC) दावा आहे की, लठ्ठ लोक आणि ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना हृदयविकाराचे निदान होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे, तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय, तुमच्या शरीराचे योग्य वजन काय असावे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तुमच्या बीएमआयचे मूल्यांकन करा. हे आवश्यक आहे कारण जास्त वजनामुळे तुमच्या हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर काही अतिरिक्त ताण येऊ शकतो.

हेही वाचा – थंड की गरम, केस धुण्यासाठी कोणते पाणी योग्य? ते आठवड्यातून किती वेळा धुवावे? जाणून घ्या, काय करावे, काय नाही?

निरोगी अन्न आणि पेय निवडणे
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी हे निश्चितपणे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. एखाद्याने दररोज ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश आहारात केला पाहिजे, कारण निरोगी अन्न आणि पेये सेवन केल्याने हृदयविकार आणि त्याची गुंतागुंत टाळण्यास मदत होते. ताजी फळे आणि भाज्यांव्यतिरिक्त, आपल्या आहारात मीठ आणि साखरेचे प्रमाण मर्यादित करणे ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे.

नियमित व्यायाम करा
तुमच्या दिनचर्येत नियमित व्यायामाचा समावेश केल्याने तुमचे वजन निरोगी राहतेच पण रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉलच्या समस्यांमुळे तुम्हाला त्रास होण्याचा धोकाही कमी होतो. CDC शिफारस करतो की, प्रौढांनी प्रत्येक आठवड्याला २ तास आणि ३० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करावा. यामध्ये सायकल चालविणे आणि वेगाने चालणे यांचा समावेश असू शकतो.

हेही वाचा – आता तरी ब्रेक घ्या! ‘या’ पेक्षा जास्त वेळ फोनवर बोलण्याची चूक करू नका; उच्च रक्तदाबासाठी ठरू शकते कारण

धूम्रपान सोडा
सिगारेट ओढणे आरोग्याच्या अनेक समस्यांशी निगडित आहे. याव्यतिरिक्त, ते हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते. जे धूम्रपान करत नाहीत त्यांनी सुरू करू नये, परंतु जे करतात त्यांनी, लवकरात लवकर धूम्रपान सोडल्याने हृदयविकाराचा धोका कमी होईल.

ठराविक वेळेच्या अंतराने तपासणे
शेवटचे पण महत्त्वाचे. लोकांनी ठराविक अंतराने त्यांच्या डॉक्टरांना भेट दिली पाहिजे. संघटना सांगते की अचूक कालावधीत संपूर्ण शरीराची तपासणी करणे उचित आहे, कारण यामुळे तुमच्या शरीरात होणारे कोणतेही बदल, आरोग्याच्या समस्यांबाबत कळू शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5 lifestyle changes to prevent heart diseases snk

First published on: 07-05-2023 at 14:53 IST
Next Story
आता तरी ब्रेक घ्या! ‘या’ पेक्षा जास्त वेळ फोनवर बोलण्याची चूक करू नका; उच्च रक्तदाबासाठी ठरू शकते कारण