बाळाचे संगोपन करणे हा आई-वडिलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. जेव्हा बाळाचा जन्म होतो, तेव्हापासून पालकत्वाचा प्रवास सुरू होतो. आपल्या बाळाला काय खायला द्यावे याबद्दल पालकांना बऱ्याचदा शंका असते. अनेकदा अर्थपूर्ण मत आणि विरोधाभासी सल्ला ऐकून पालकांचा गोंधळ होतो. बाळासाठी त्याच्या आईचे दूध खूप आवश्यक असते, कारण त्यामुळे त्याचा विकास लवकर होतो. डॉक्टरांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्व जण नेहमी सांगतात की, सहा महिन्यांपर्यंतच्या बाळाला फक्त आईचे दूध दिले पाहिजे. काही कारणास्तव बाळाला आईचे दूध मिळाले नाही तर अशा परिस्थितीमध्ये पावडरचे दूध (फॉर्म्युला) दिले जाते. काही ठिकाणी आईचे दूध नसेल तर गायीचे दूध बाळाला पाजले जाते. पण, बाळाला गायीचे दूध केव्हा सुरू करावे? याबाबत अनेक पालकांच्या मनात शंका असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नव्या मार्गदर्शक तत्वानुसार, “पावडरचे दूध (फॉर्म्युला) पिणारे बाळ सहा महिन्यांनंतर गायीचे दूध पिऊ शकते”, असे सांगितले आहे. तर ऑस्ट्रेलियन सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार, “पालकांनी बाळाला गायीचे दूध देण्यापूर्वी १२ महिने प्रतीक्षा करावी”, असे सुचवते. अशा परिस्थितीमध्ये पालक आणि आरोग्यतज्ज्ञांचा गोंधळ होणे सहाजिकच आहे.

तर पालकांना WHO च्या नव्या मार्गदर्शक तत्वाबाबत काय माहीत असणे आवश्यक आहे? गायीचे दूध पर्याय म्हणून केव्हा सुरू करावे?

WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात?

गेल्या वर्षी WHO ने दोन वर्षांखालील मुलांसाठी जागतिक आहार मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती, ज्यानुसार अर्धे किंवा पूर्णपणे पावडरचे दूध (फॉर्म्युला) पिणाऱ्या बाळाला सहा महिन्यांपासून संपूर्ण प्राण्यांचे दूध (गाईचे दूध) देता येऊ शकते. ही शिफारस WHO ने संशोधनाचा पद्धतशीरपणे पुन्हा अभ्यास करून केली आहे. या संशोधनामध्ये सहा महिन्यांपासून पावडरचे दूध (फॉर्म्युला) पिणाऱ्या बाळाची, पाश्चराइज्ड किंवा उकळलेले प्राण्यांचे दूध पिणाऱ्या बाळासह तुलना करून बाळाची वाढ, आरोग्य आणि विकास याचा अभ्यास करण्यात आला आहे.

संशोधनाचा पुन्हा अभ्यास केल्यानंतर, ज्या बाळांना पावडरचे दूध दिले गेले होते, त्यांची वाढ आणि विकास ही प्राण्यांचे ताजे दूध पिणाऱ्या बाळांपेक्षा चांगली होते हे दर्शवणारा कोणताही पुरावा आढळला नाही.

प्राण्यांचे ताजे दूध पिणाऱ्या बाळांमध्ये लोहाच्या कमतरतेची अॅनिमियाची वाढ झाल्याचे समोर आले नाही. पण, WHO ने नमूद केले की, सहा महिन्यांपासून बाळाला दररोज लोहयुक्त घन पदार्थ देऊन हे टाळता येऊ शकते.

उपलब्ध पुराव्याच्या जोरावर, WHO ने शिफारस केली आहे की, “ज्या बाळाला फक्त पावडरचे दूध (फॉर्म्युला) किंवा आईचे दूध दिले आहे, त्यांना सहा महिन्यांच्या वयापासून याव्यतिरिक्त प्राण्यांचे दूध दिले जाऊ शकते.”

WHO ने म्हटले आहे की, बाळांना दिल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या दुधामध्ये, पाश्चरीकृत संपूर्ण फॅट्सयुक्त ताजे दूध (pasteurised full-fat fresh milk), बाष्पीभवन केलेले दूध (reconstituted evaporated milk), आंबवलेले दूध (fermented milk) किंवा दही यांचा समावेश असू शकतो. परंतु, यामध्ये फ्लेवर्ड किंवा गोड दूध, कंडेन्स्ड मिल्क (condensed milk) किंवा स्किम मिल्क (skim milk) यांचा समावेश नसावा.

गायीचे दूध सहा महिन्यांनी द्यावे की १२ महिन्यांनी? हे वादग्रस्त का आहे?

ऑस्ट्रेलियन सरकारी मार्गदर्शक तत्त्वे शिफारस करतात की, “१२ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाला मुख्य पेय म्हणून गायीचे दूध देऊ नये.” ही शिफारस WHO ने जाहीर केलेल्या नव्या सल्ल्याच्या विरुद्ध आहे. पण, WHO चा हा सल्ला थेट पालकांऐवजी सरकार आणि आरोग्य प्राधिकरणांसाठी आहे हे लक्षात घ्यायला हवे.

ऑस्ट्रेलियन आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा पुन्हा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि नव्या WHO मार्गदर्शक तत्वामध्ये त्या प्रक्रियेची माहिती देणे अपेक्षित आहे.

हेही वाचा – उन्हाळ्यात कलिंगड, काकडी टोमॅटो पालक का खावे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

बाळाच्या विकासासाठी लोह का आहे आवश्यक?

लोह हे प्रत्येकासाठी आवश्यक पोषक तत्व आहे, परंतु ते विशेषतः बाळासाठी महत्त्वाचे आहे, कारण ते वाढ आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे. गर्भधारणेच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये बाळांच्या शरीरात साधारणपणे पुरेसे लोह साठवून ठेवले जाते, जेणेकरून ते कमीतकमी सहा महिन्यांचे होईपर्यंत शरीरात टिकून राहील. पण, जर बाळांचा जन्म लवकर (अकाली) झाला असेल, जर त्यांची नाळ खूप घट्ट बांधली गेली किंवा त्यांच्या आईला गर्भधारणेदरम्यान अॅनिमिया झाला असेल तर त्याच्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते.

गाईचे दूध लोहाचा चांगला स्रोत नाही. बहुतेक पावडर दूध (फॉर्म्युला) हे गाईच्या दुधापासून बनवले जाते आणि त्यात लोहयुक्त घटकांचा समावेश केलेला असतो. आईच्या दुधातही लोहाचे प्रमाण कमी असते. परंतु, गाईच्या दुधातील लोहापेक्षा, आईच्या दुधातील लोह बाळाच्या शरीराद्वारे जास्त प्रमाणात घेतले जाते.

सहा महिन्यांनंतर लोहाचा पुरवठा करण्यासाठी बाळाला फक्त दुधावर (पावडरचे दुधावर) अवलंबून राहू नये. त्यामुळे WHO च्या ताज्या सल्ल्यानुसार, या वयापासून बाळांना लोहयुक्त पदार्थ देण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे.” या पदार्थांमध्ये हे समाविष्ट आहे : मांस, अंडी, भाज्या, बीन्स आणि हिरव्या पालेभाज्यांसह, कडधान्ये, मसूर, बिया आणि दाणे (जसे की शेंगदाणे किंवा इतर दाण्यांचे बटर, परंतु मीठ किंवा साखर न घालता).

तुम्ही कदाचित ऐकले असेल की, बाळांना संपूर्ण गायीचे दूध दिल्यास ॲलर्जी होऊ शकते. खरं तर संपूर्ण गाईच्या दुधामुळे ॲलर्जी होण्याची शक्यता नसते. गाईच्या दुधावर आधारित पावडरच्या दूधामुळे (फॉर्म्युला) ॲलर्जी होऊ शकते

पावडरचे दूध (फॉर्म्युला) घेणाऱ्या बाळांना सहा महिन्यांपासून गाईचे दूध घेता येऊ शकते, अशी WHO ने केलेली ही शिफारस तुमचे पैसे वाचवू शकते. ताज्या दुधापेक्षा पावडरचे दूध (फॉर्म्युला) किंमत पाचपट जास्त असू शकते (ऑस्ट्रेलियन डॉलर २.२५-८.३० प्रति लिटर विरुद्ध ऑस्ट्रेलियन डॉलर १.५० प्रति लिटर).

जी कुटुंबे पावडरचे दूध (फॉर्म्युला) वापरणे सुरू ठेवतात, त्यांच्यासाठी हे जाणून घेणे आश्वासक असू शकते की, “जर एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अन्नपुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास ताजे गाईचे दूध सहा महिन्यांपासून वापरणे योग्य आहे.”

स्तनपानाबाबतच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काय बदलले नाही हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. WHO अजूनही शिफारस करतो की, “बाळांना पहिले सहा महिने फक्त आईचे दूध द्यावे आणि नंतर दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान चालू ठेवावे. सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना, ज्यांना स्तनपान दिले जाऊ शकत नाही किंवा ज्यांना अतिरिक्त दुधाची गरज आहे, त्यांना पावडरचे दूध (फॉर्म्युला) पाजणे आवश्यक आहे. १२ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळासाठी पावडरचे दूध (फॉर्म्युला) देण्याची शिफारस केलेली नाही.

ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध सर्व पावडरच्या दुधा (फॉर्म्युला) मध्ये पोषण रचना आणि अन्न सुरक्षिततेसाठी समान मानक पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे येथे उपलब्ध असलेले सर्वात स्वस्त पावडरचे दूध (फॉर्म्युला) सर्वात महाग पावडर दूध (फॉर्म्युला) इतकाच चांगला आहे.

हेही वाचा – भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…

निष्कर्ष काय आहे?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बाळ लोहयुक्त पदार्थांसह निरोगी आहाराचा भाग म्हणून सहा महिन्यांपासून ताज्या, संपूर्ण फॅक्टयुक्त गाईच्या दुधाचे सुरक्षितपणे सेवन करू शकते. त्याचप्रमाणे गाईच्या दुधाचा वापर सहा महिन्यांपासून स्तनपानाला पूरक आहार म्हणून वापरता येऊ शकतो, पण त्याचबरोबर लोहयुक्त पदार्थांचे सेवन आवश्यक आहे.