रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी अनेक घरांमध्ये चिकन, मटण किंवा मासे अशाप्रकारचे नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात. मात्र मासे किंवा मच्छीला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. माश्याचे कालवण किंवा फिश फ्रायसारखे पदार्थ बनवल्यानंतर त्याचा वास, दर्प खूप वेळासाठी स्वयंपाकघरात राहतो. अशावेळेस जर कुणी घरी आले किंवा कुणी पाहुणेमंडळी घरी येणार असल्यास हा दुर्गंध घालवण्यासाठी आपण सुगंधी स्प्रे, रूम फ्रेशनरचा उपयोग करून पाहतो.

परंतु बऱ्याचदा असे उपाय तात्पुरते फायदेशीर ठरतात आणि पुन्हा घरात माश्याचा दुर्गंध येऊ लागतो. असे होऊ नये त्यासाठी अतिशय सोप्या आणि उपयुक्त टिप्स एनडीटीव्हीच्या एका लेखामधून सांगितले असल्याचे दिसते. काय आहेत या चार टिप्स पाहा.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
how to keep cold water in clay pot
Jugaad Video : फक्त पाच रुपयांचे मीठ वापरा अन् करा गार फ्रिजसारखं माठातील पाणी
ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व

हेही वाचा : Kitchen hack : यापुढे चहा किंवा दूध कधीही उतू जाणार नाही; फक्त ‘ही’ भन्नाट युक्ती वापरून पाहा…

स्वयंपाकघरातील मच्छीचा वास कसा घालवावा?

१. कापूर जाळणे

घरातील हवा शुद्ध करण्यासाठी, प्रसन्न करण्यातही आपण कापराचा वापर करत असतो. कापराच्या सुगंधामुळे, घरातील घाणेरडा वास किंवा दुर्गंध घालवण्यास मदत होते. त्यामुळे, मच्छीचा वास येत असल्यास घरात किंवा स्वयंपाकघरात एक-दोन कापराच्या वड्या जाळू शकता.

२. लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर

लिंबाचा किंवा व्हिनेगरचा वापर हा अन्नपदार्थांमध्ये तर होतंच असतो. मात्र या दोन गोष्टींचा वापर घर स्वच्छ आणि सुगंधी ठेवण्यासाठीदेखील केला जातो. आता लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर करून स्वयंपाकघरातील मच्छीचा वास कसा घालवायचा ते पाहा. यासाठी एका लहानश्या पातेल्यामध्ये थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित उकळून घ्या. लिंबाचा रस उकळत असताना वा व्हिनेगर आणि पाणी उकळत असताना त्याच्या येणाऱ्या हलक्या गंधामुळे, माश्याचा वास नाहीसा होण्यास मदत होते.

हेही वाचा : Kitchen tips : भात गिचगिचीत किंवा खूप मोकळा होतोय? ‘ही’ असू शकतात त्याची कारणं; या पाच उपयुक्त टिप्स पाहा…

३. दालचिनी आणि लवंगीचा वापर

घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या लवंग आणि दालचिनी या मसाल्याच्या पदार्थांचा वापर करूनही घरातील दुर्गंधी घालवण्यास मदत होते. यासाठी, एका पातेल्यात पाणी घ्या. त्यामध्ये थोडी दालचिनी आणि लवंग घालून उकळून घ्यावे. मसाले उकळत असताना, पातेल्यावर झाकण ठेऊ नका. लवंग आणि दालचिनी पाण्यात उकळून घेतल्याने घरातील हवेमधील दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल.

४. दरवाजे आणि खिडक्यांचा वापर

सध्या अनेक घरांमध्ये स्वयंपाक बनवताना होणार धूर वगैरे निघून जाण्यासाठी गॅस शेगडीवर एक एक्सझोस्ट चिमणी बसवल्याचे दिसते. मात्र मच्छीची दुर्गंध लवकरात लवकर घालवायची असल्यास स्वयंपाक घरातील खिडक्या, बाल्कनीचे दरवाजे उघडून ठेवा. घरामध्ये येणाऱ्या हवेमुळे, सुर्प्रकाशामुळे असे वास निघून जाण्यास मदत हते. म्हणून शक्य असेल तेव्हा घरातील सर्व दारं-खिडक्या उघडून घरातील हवा खेळती ठेवावी.