How To Get Rid of Mosquitoes: घरात डास असतील, तर झोप तर खराब होतेच, पण अनेक आजारांचा धोकाही वाढतो. या डासांमुळे सर्वांनाच त्रास होतो. मलेरीया आणि डेंग्यू सारखे जीवघातक आजार डासांद्वारे होत असतात. डासांपासून वाचण्यासाठी सर्वसाधारणपणे बाजारात मिळणाऱ्या मौस्कीटो रेपेलन्टचा वापर केला जातो. परंतु त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. आज आपण डासांना पळवून लावण्यासाठी देशी घरगुती जुगाड पाहूयात, जे एका महिलेने दाखवलं आहे.

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडिओ आहे. ज्यात महिलेने घरातील सर्वात मोठी समस्या दूर कशी करता येईल, यासाठी उपाय सांगितला आहे. महिलेने डासांना पळवून लावण्यासाठी जबरदस्त जुगाड दाखवला आहे. हा जुगाड सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहूयात महिलेने नेमकं काय केलं आहे.

(हे ही वाचा : Kitchen Jugaad: पोळ्यांवर इस्त्री फिरवा, ना गॅस ना रोटी मेकर सर्व काही विसरुन जाल, वेळ आणि मेहनत दोन्हीची होईल बचत)

तुम्हाला नेमकं काय करायचं? 

गृहिणीने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, महिलेने एक खराब झालेली प्लेट घेतली आणि मग त्यात कापूस घेतलं आहे. त्यानंतर महिलेले तमालपत्र घेतलं आहे. त्यानंतर एक नारळ घेऊन त्या नारळाची महिलेने साल काढून प्लेटमध्ये टाकलं आहे. त्यानंतर महिलेने एक कापूर घेतलं आहे. कडुलिंबाची पाने, कांद्याचा किंवा लसणाचा पाचोळा घेतला आहे. मग यामध्ये महिलेने थोडसं तूप घेतलं आहे. आता यानंतर या सर्व वस्तू एकत्र करुन महिलेने त्यांना जाळलं आहे. हे जाळल्यानंतर घरात संपूर्ण धूर पसरेल. यामुळे घरातील डासांचा नायनाट होईल. घराजवळही डास येणार नाही, असा दावा या महिलेने केला आहे.

येथे पाहा व्हिडिओ  

Puneri Tadka या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)