Kitchen Jugaad Video: पोळी हा आपल्या दररोजच्या आहारातील अविभाज्य घटक आहे. दुपारचे जेवण असो की रात्री पोळी ही आपल्याला जेवणात हवीच असते. पोळ्या करणे हे सकाळच्या वेळी स्वयंपाकाच्या कामांमधील एक महत्त्वाचे काम असते. पोळ्या करणं म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही. अगदी पीठ मळण्यापासून ते चपाती शेकण्यापर्यंत, सर्वकाही एक कौशल्याचं काम आहे. आपण पोळ्या लाटतो आणि तव्यावर शेकून घेतो. किंवा रोटी मेकिंग मशिन वापरल्यास तुम्हाला लाटण्याची आणि शेकण्याचे काम करण्याची काही गरज नाही. काही मिनिटांतच गरमागरम फुललेल्या चपात्या तयार होतात. परंतु तुम्ही कधी इस्त्रीचा वापर करुन कधी पोळी बनविली आहे का? एका गृहिनीने हा जुगाड दाखवला आहे.

आपल्या देशात जुगाडांची काही कमतरता नाही. प्रत्येकदिनी जुगाड दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तर अशातच काही जण असा आगळा वेगळा जुगाड लावतात की बघणारेही थक्क होतात. इस्त्रीचा वापर कपडे प्रेस करण्यासाठी केला जातो, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु याच इस्त्रीच्या साहाय्याने पोळ्या करण्यासाठीही मदत होऊ शकते, हे वाचून तुम्हाला विचित्रच वाटलं असेल, ना…पण असे एका व्हिडिओतून समोर आले आहे. एका महिलेने चक्क इस्त्रीच्या मदतीने पोळ्या शेकलेल्या दिसत आहेत. महिलेने नेमकं काय केलं ते पाहूयात…

what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
Bhastrika Pranayama
Bhastrika Pranayama VIDEO : स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी घेताय? त्यापेक्षा नियमित करा भस्त्रिका प्राणायाम
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

(हे ही वाचा : Kitchen Jugaad: दुधात कांदा टाकताच कमाल झाली; फक्त एकदा Video पाहा, पुन्हा-पुन्हा कराल हा उपाय )

व्हिडीओत गृहिणीने दाखवल्यानुसार, महिलेने पोळ्या ज्या प्रमाणे आपण लाटतो. त्याचप्रमाणे गोल-गोल पोळ्या लाटून घेतल्या आहेत आणि त्या तव्यावर हलक्या शेकून घेतल्या आहेत. परंतु याच पोळ्या तुम्हाला बऱ्याच दिवसासाठी साठवून ठेवायच्या असतील तर तुम्ही या हलक्या शेकून घेतलेल्या पोळ्या घेऊन इस्त्रीच्या साहाय्याने शेकून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला पोळ्यांवर इस्त्री फिरवून घ्यायची आहे. तुमच्याकडे गॅस किंवा रोटीमेकर नसेल, तर इस्त्रीच्या मदतीने तुम्हाला पोळ्या शेकता येईल, असे गृहिणीचे म्हणणे आहे.

Sb Vlog या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. (chapati -YouTube) व्हिडीओ पाहण्यासाठी कंसावर क्लिक करा. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)