करोना व्हायरसच्या संकटामुळे सरकारकडून लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. 251 रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने ‘Work From Home Pack’ नाव दिले आहे.

251 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. डेटामर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड म्हणजे 64 kbps चा होईल. 51 दिवसांची वैधता असलेहा हा केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन आहे, त्यामुळे दररोज 2 जीबी डेटासह युजर्सना एकूण 102 जीबी डेटा मिळेल. केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन असल्याने या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉल आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

याशिवाय दोन दिवसांपूर्वीच कंपनीने आपले निवडक 4G डेटा व्हाउचर प्लॅन अपग्रेड केले, त्यामुळे आता जिओ युजर्सना 4G डेटा व्हाउचरमध्ये डबल डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. जिओने बदल केलेल्या 4G डेटा व्हाउचरमध्ये (Booster Pack) 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

आणखी वाचा- ‘वर्क फ्रॉम होम’साठी बीएसएनएलचा Free इंटरनेट प्लॅन, दररोज मिळेल 5GB डेटा

जाणून घेऊया कोणत्या 4G डेटा व्हाउचर प्लॅनमध्ये केले आहेत बदल :-
आता 11 रुपयांच्या बूस्टर प्लॅनमध्ये तुमच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनची व्हॅलिडिटी आणि अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 75 मिनिटं मिळतील. तर, 21 रुपयांच्या 4G डेटा व्हाउचरमध्ये युजर्सना अ‍ॅक्टिव्ह प्लॅनच्या वैधतेसह 2जीबी डेटा आणि जिओ-टू-नॉन जिओ कॉलिंगसाठी 200 मिनिटं मिळतील. याशिवाय, 51 रुपयांच्या 4G डेटा व्हाउचरमध्ये अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 500 मिनिटं मिळतील. या प्लॅनमध्ये मिळाणारा डेटाही 3जीबीऐवजी 6जीबी मिळेल. प्लॅनची व्हॅलिडिटी अ‍ॅक्टिव्ह प्लॅनइतकीच असेल. तर, 101 रुपयांच्या 4G डेटा व्हाउचरमध्ये आता 1000 नॉन-जिओ मिनिट मिळतील, याशिवाय आता 6जीबी डेटाऐवजी 12जीबी डेटा मिळेल. या सर्व प्लॅनमध्ये जिओ अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल.