आपण नवीन वर्षात प्रवेश करत असताना, आपल्या आरोग्य आणि फिटनेसला प्राधान्य देण्याची इच्छा अनेकदा आपल्या संकल्पातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. २०२४ मध्ये तुम्हाला जर आकारात राहायचे असेल म्हणजे तुम्हाला फार जाड किंवा फार बारीक शरीर नको असेल तर तुम्ही असा विचार करणारे एकटे नाही आहात. तुमच्या निरोगी प्रवासाला सुरुवात करण्यासाठी, पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी तुम्हाला शारीरिक तंदुरुस्ती आणि एकूणच निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन करणारे पाच टिप्स सांगितल्या आहेत. “२०२४ मध्ये या ५ गोष्टी जर नीट पाळल्या तर आणि तुमची तब्येत चांगली सुधारेल आणि तुम्ही तंदरुस्त राहाल,” असे त्यांनी इंस्टाग्रामवर माहिती देताना सांगितले.

१. वजन कमी करणारे पेय, चहा किंवा स्मूदीज पिणे थांबवा

वजन कमी करणारी अनेक पेये अल्पकालीन उपाय म्हणून विकली जातात, अनेकदा विशिष्ट आहार योजनेचा भाग म्हणूनही त्यांचे सेवन केले जाते. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना फिटनेस आणि योग तज्ञ निषाद सिंग कन्याल,यांनी नमूद केले की, शाश्वत पद्धतीने वजन कमी करण्यासाठी दीर्घकालीन जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहेत. “निरोगी वजन राखण्यासाठी फक्त पेयांवर अवलंबून राहणे हा व्यावहारिक दृष्टीकोन असू शकत नाही. दीर्घकालीन वजन व्यवस्थापनामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी सवयींचा समावेश होतो.”

Benefits Of Adding Jaswandi Petals In Tea Can gudhal Phool Help Reduce Blood Sugar
चहात ‘या’ फुलाच्या पाकळ्या घातल्याने डायबिटीस कमी करण्याचा मार्ग होईल सोपा? तज्ज्ञांनी सांगितलं किती हवं प्रमाण?
ICMR has issued guidelines on when to avoid drinking milk tea and when to consume tea and coffee
‘उत्तम आरोग्यासाठी दुधाचा चहा टाळा’
Fresh vs pre-shaved coconut water
ताजे की पॅकबंद? कोणते नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
how to stop period pain
VIDEO : महिलांनो, मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी करा ही तीन योगासने, पाहा व्हिडीओ
onion crisis central government lifts ban on onion export before lok sabha poll
ही निवडणूकसुद्धा कांद्याची!
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?

हेही वाचा – गॅसवर लाटणे गरम करा अन् मग लाटा पोळ्या…पाहा हटके जुगाडची कमाल!

२. किती प्रमाणात खात यावर लक्ष केंद्रित करा

कन्याल म्हणाले की, कॅलरी सेवन नियंत्रित करण्यासाठी, सावधगिरीने खाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि अतिसेवन रोखण्यासाठी किती प्रमाणात खात आहात यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तुमच्या जेवणात प्रथिने, कर्बोदके, फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा योग्य भाग समाविष्ट करून, तुमच्या शरीराला योग्य कार्यासाठी आवश्यक पोषक द्रव्ये मिळत आहेत याची खात्री करून ते दिवसभर पोषक तत्वांचे संतुलित साधा करण्यास प्रोत्साहन देत

३. प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज केलेल्या अन्नापेक्षा ताजे अन्न निवडा

ताजे खाद्यपदार्थ अत्यावश्यक पोषक, फायबर आणि इतर आरोग्यास प्रोत्साहन देणारी संयुगे पुरवतात. तर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये अनेकदा शर्करा, अनहेल्दी फॅट्स असते आणि असे पदार्थ असतात जे विविध आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. ताजे अन्नपदार्थ निवडा, विशेषत: कार्बोहायड्रेट आणि फायबर असलेले खाद्यपदार्थ, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि पोट भरल्याची भावना वाढविण्यात मदत करू शकते.

४. कार्डिओपेक्षा स्नायूंना प्रशिक्षण देण्यास अधिक महत्त्व द्या

व्यायामादरम्यान कॅलरी घटवण्यासाठी कार्डिओ प्रभावी आहे, तर रेझिटन्स ट्रेनिस स्नायू बळकट करून दीर्घकालीन फॅट्स कमी करण्यास योगदान देते. एखाद्या व्यक्तीचे जितके जास्त स्नायू बळकट होतात, तितक्या जास्त कॅलरी ते विश्रांती घेताना घटतात. पण कन्याल यांनी स्पष्ट केले की, संतुलित दृष्टीकोनतून दोन्हीचा समावेश करून, सर्वसमावेशक फिटनेस सुनिश्चित करा.”

हेही वाचा – हिवाळ्यात दररोज हॉट चॉकलेट पित आहात? तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो माहितीये का?

५. रात्री उशिरा पार्ट्या किंवा टिव्ही, सीरीज पाहात जागण्यापेक्षा झोपेला प्राधान्य द्या

लवकर झोपून पुरेशी आणि दर्जेदार झोप घेणे एकूण आरोग्य, बौद्धिक, भावनिक, आणि शारीरिक कार्यक्षमतेस समर्थन देते हे सिद्ध झाले आहे. याउलट, टेलीव्हिजन पाहण्यासाठी उशिरापर्यंत जागणे किंवा रात्री उशिरापर्यंतच्या पार्टी करणे हे नैसर्गिक झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे झोपेची कमतरता आणि भूक नियंत्रित करणार्‍या हार्मोन्समध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

“मेहनत नेहमीच फळ देते, शॉर्टकट तुम्हाला तिथे पोहोचवू शकतात, परंतु परिणाम त्याचे फक्त अल्पकालीन असतील,” असा निष्कर्ष पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी निष्कर्ष सांगितला आहे.