Kitchen jugaad Video: भारतीय महिलांमध्ये कपाळाला टिकली लावण्याची परंपरा दिसून येते. आपल्याकडे कपाळाला टिकली लावणे हा एक आपल्या संस्कृतीचा भाग मानला जातो. कपाळावर टिकली शिवाय एखाद्या महिलेचा शृगांर अपूर्ण राहिल्यासारखा वाटतो. टिकलीने प्रत्येक महिलेचे सौंदर्य अधिक खुलले जाते. कपाळावर लावण्यात येणारी ही टिकली तुम्ही कधी घरातील चमचा किंवा चिमट्याला लावून पाहिली आहात का? तुम्हीही विचारात पडले असेल ना की, आम्ही तुम्हाला असं विचित्र काय सांगतोय, पण चमचा किंवा चिमट्याला टिकली लावण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा जुगाड दाखवला आहे. याचा परिणाम असा आहे की, पाहूनच तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. किचन जुगाडाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

चमचा आणि टिकली तसा दोघांचाही एकमेकांशी काहीच संबंध नाही. पण जर का तुम्ही या दोघांचा हा उपाय एकदा पाहिला तर तो पुन्हा पुन्हा कराल, असे गृहिणीचे म्हणणे आहे. आता चमचा किंवा चिमट्याला टिकली लावण्याचा काय फायदा आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग या व्हिडीओमध्ये काय आहे पाहुयात.

A woman Instantly make vermicelli
“किती छान!” काकूंनी झटपट बनवल्या हातावरच्या शेवया, Viral Video पाहून बालपणीच्या आठवणी झाल्या जाग्या
Menstrual Cleansing Day 2024 what if Menstrual cycle does not continue
पाळी सुरूच झाली नाही तर?
Viral Video A dog challenged a tiger
नाद करायचा नाय! निवांत बसलेल्या वाघाला कुत्र्याने दिली खुन्नस; पुढच्या काही सेकंदात झालं असं काही… VIDEO पाहून उडेल थरकाप
a man Soaking chapati with tap water and eating it
Viral Video : वडिलांचा संघर्ष कुणाला दिसत नाही! नळ्याच्या पाण्याने पोळी भिजवून खातोय, व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
This is why experts warn against storing your toothbrush in the bathroom
तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा
csk vs pbks selfish ms dhoni sends back daryl mitchell slammed for denying single ipl 2024
“धोनी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, स्वार्थी…”, PBKS vs CSK सामन्यातील धोनीच्या त्या कृतीवर भडकले चाहते, पाहा VIDEO
Army man Daughter Vidaai Emotional Video
शेवटी बापाचं काळीज; लेकीच्या लग्नात आर्मी ऑफिसर धायमोकलून रडला; VIDEO पाहून येईल डोळ्यात पाणी

व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने एक चिमटा घेतला आहे आणि त्यावर दोन्ही बाजुने लसूणचा रस चोळला आहे. मग गॅसवर महिलेने चिमट्याला थोड गरम केलं आहे. त्यानंतर महिलेने चिमट्यावर पाकिटातील सर्व टिकल्या लावल्या आहेत. थोडा वेळ तसचं ठेवून महिलेने त्या चिमट्यावरिल सर्व टिकल्या काढून पुन्हा पाकिटाला लावल्या आहेत, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण याचा फायदा काय होणार, तर महिलेने सांगितल्यानुसार, टिकली लावली की, काही महिलांना त्या जागेवर पुरळ येतात किंवा मग खूप खाज येते. टिकलीच्या गोंदमध्ये वापरण्यात येणाऱ्या हानिकारक केमिकल्समुळे या त्वचेच्या समस्या निर्माण होतात. मात्र, हा त्रास कमी करण्यासाठी हा उपाय करून बघा, असं गृहिणीचे म्हणणे आहे.

येथे पाहा व्हिडिओ

Avika Rawat Foods या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)