तुम्ही तुमच्या आवडत्या आउटलेटवर खरेदी केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर दुकानदार तुम्हाला कागदी बिल पावती देतो. पण, या कागदी पावत्या आपण अनेकदा फोल्ड करून बॅगमध्ये ठेवतो किंवा खूप वेळ हातात घेऊन खेळ करत राहतो. अनेकदा या पावत्या लहान मुलांच्या हातात खेळण्यासाठी दिल्या जातात, पण या पावत्या आपल्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे समोर आले आहे; त्यामुळे या कागदी पावत्यांना स्पर्श करणे टाळलं पाहिजे. या पावत्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चमकदार प्लास्टिकच्या कागदाला थर्मल पेपर असे म्हणतात. त्यावर अक्षरं मुद्रित करण्यासाठी उष्णतेचा वापर केला जातो, अशी माहिती iThrive संस्थापक आणि सीईओ फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान यांनी दिली.

बिस्फेनॉल ए (बीपीए) आणि बिस्फेनॉल एस (बीपीएस) ही घातक मुख्य रसायने आहेत, जी या प्रकारच्या कागदाच्या थर्मल कोटिंगमध्ये वापरली जातात. बीपीए आणि बीपीएस दोन्ही विघटनकारी रसायने आहेत, यामुळे ते व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन प्रणालीत अडथळा निर्माण करू शकतात, असे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील मिरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील कंसल्टंट इंटरनल मेडिसिन डॉ. अनिकेत मुळे म्हणाले.

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान म्हणाल्या की, अनेक कंपन्या, अनेक प्लास्टिक उत्पादनांच्या पॅकेजिंग आणि मार्केटिंगमध्ये ‘बीपीए फ्री’ असा उल्लेख केलेला असतो. अशाप्रकारच्या घातक रासायनिक घटकांविषयी आतापर्यंत वैद्यकीय साहित्यात खूप चांगल्याप्रकारे सांगण्यात आले आहेत. पण, खूप कमी लोकांना माहिती आहे की, बीपीए आणि फिनॉलसह इतर हानिकारक घटक या छापील पावत्यांमध्ये वापरले जात आहे, असेही प्रधान म्हणाल्या.

यावर सर्टिफाइड योगा आणि न्यूट्रिशन कोच आदित्य नटराज यांनी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. यात त्याने कागदी प्रिंटेड पावतीव हेअर स्ट्रेटनरची हिट वापरली, यामुळे पावतीवर काळी शाई गायब होत पूर्ण पावती काळी दिसू लागली, कारण अशाप्रकारच्या पावत्या बनवण्यासाठी कंपन्या विविध प्रकारच्या रसायनांचा वापर करतात. यामुळे अशा पावत्यांना स्पर्श करणे टाळा; कारण त्यात बीपीए रसायनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, जे प्लास्टिकच्या उत्पादनादरम्यान तयार होणारे विषारी रसायन आहे, असे नटराज यांनी सांगितले.

कागदी पावत्या धोकादायक का आहेत?

थर्मल पेपरच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात फिनॉल असते, जे आपली त्वचा सहज शोषून घेते. अभ्यासातून असे समोर आले की, त्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमच्या रक्तप्रवाहात बीपीएची पातळी वाढू शकते. यात तुम्हाला दुकानाच्या काउंटरवर कॅश घेणाऱ्या कॅशियरमध्ये BPA आणि BPS चे प्रमाण लक्षणीयरित्या जास्त असल्याचे दिसते. यात गरोदर स्त्रिया ज्या नोकरी करतात, त्यांनी अशाप्रकारच्या विषारी पावतींना स्पर्श केल्यास त्यांच्या गर्भाला धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रधान म्हणाल्या.

या पावतीत वापरलेल्या रसायनांचा अप्रत्यक्ष संबंध प्रजनन, वाढीची समस्या, कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांसारख्या विविध आरोग्य समस्यांशी जोडला गेला आहे, असे डॉ. मुळे म्हणाले. ज्या व्यक्तींना अशाप्रकारच्या पावत्या तोंडात घालण्याची सवय असते, त्यांना अधिक धोका असतो. कारण या रसायनांच्या थेट सेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे डॉ. मुळे म्हणाले.

आपण याबद्दल काय करू शकतो?

१) थेट पावत्या हाताळणे टाळा आणि शक्य असल्यास डिजिटल पावत्या मागा.

२) याबाबत जागरूकता वाढवा, तसेच तुमच्या ओळखीतील किरकोळ दुकानांना पावती ईमेल करायला सांगा आणि अशा रसायनांचा वापर करून बनवलेल्या पावत्या हाताळणे टाळा.

३) तुम्हाला पावती स्वीकारायची असल्यास छापलेल्या बाजूला स्पर्श करणे टाळण्याचा प्रयत्न करा. प्रिंट नसलेल्या बाजूला सहसा विषारी आवरण नसते, असे प्रधान म्हणाल्या.

अमेरिकेतील काही किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांच्या तक्रारीनंतर अशाप्रकारच्या पावत्या देणं बंद केलं आहे, पण भारतात याबाबतची जागरूकता कमी असल्याने आजही अनेक स्टोअर्समध्ये या पावत्या सर्रास वापरल्या जात आहेत, असे प्रधान म्हणाले.