थोडे जास्तीचे श्रम झाले की काही जण लगेचच थकतात. मात्र दिर्घकाळ सक्रीय रहायचे असल्यास योगशास्त्रात काही विशिष्ट आसने आहेत. ही आसने नियमित केल्यास तुम्हाला लवकर दमायला होत नाही. हे दंड स्थितीतील आसन आहे. या आसनाची स्थिती महादेवाच्या तांडवनृत्यासारखी किंवा नटराजाच्या मूर्तीच्या आकृतीबंधासारखी असते. म्हणूनच याला ‘नटराजासन’ म्हणतात.

प्रथम दंड स्थितीत उभे रहावे, मग दोन्ही हात शरीराजवळ ठेवावे, नजर समोर असावी, पहिल्यांदा डावा पाय गुडघ्यात दुमडून मागच्या बाजूस न्यावा, डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा किंवा चवडा पकडावा, दुसरा हात म्हणजे उजवा हात सरळ जमिनीला समांतर ठेवावा. नजर उजव्या हातांच्या बोटांकडे स्थिर करावी. अशा प्रकारे हे आसन दहा सेकंदापर्यंत सुरूवातीला टिकवता येते. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही पायांनी हे आसन करावे म्हणजे एकदा डावा पाय शरीराच्या मागील बाजूस नेऊन डाव्या हाताने घोटा पकडावा. डाव्या बाजूने आसन पूर्ण होताच उजव्या बाजूने करावे. असे चार-पाच वेळा रोज करण्यास हरकत नाही. आसनादरम्यान श्वसन संथ ठेवावे. या आसनाचा कालावधी सुरूवातीला आठ सेकंद मग पंधरा सेकंद करावा. नजर हाताच्या बोटांवर स्थिर केली की हे आसन टिकवण्यास जड जात नाही.

Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

यामध्ये शरीराच्या प्रत्येक सांध्याला उत्तम प्रकारे व्यायाम होतो आणि सांधे सक्रीय होतात. सांधेदुखी असलेल्यानी हे आसन नियमित करावे. त्यामुळे सांधेदुखी कमी होते. गुडघ्यांचे ऑपरेशन झालेल्यांनी आसन करू नये. खांदे , गुडघे, नितंब, घोटे, हातापायांची बोटे, हाताचे पंजे यामुळे कणखर होण्यास मदत होते. मेरूदंडाला चांगला व्यायाम मिळतो आणि लवचिकता येते. पचनशक्ती वाढते. काम करण्याची प्रेरणा मिळते. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कमरेतील दुखणी बरी होतात. म्हणूनच शक्ती निर्माण करणारे असे हे आसन प्रत्येकाने नियमित करावे. दिवसातील कोणत्याही वेळी करता येण्यासारखे सहज सुलभ आसन हे आहे. हे तोलात्मक आसन असल्याने जास्त पुढे वाकले तर पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तेव्हा सावधगिरीने आसन करावे. कोणतेही आसन करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ