Rice Papad Recipe Summer Video: पापडाच्या पारंपरिक रेसिपी ऑनलाईन जितक्या सोप्या वाटतात तितक्या करताना सोप्या असतातच असं नाही. विशेषतः ज्यामध्ये डाळ किंवा तांदूळ भिजवायचे असतील, आपल्याला कधी कधी पाण्याचे प्रमाण लक्षात येत नाही. तर काही वेळा सगळं साहित्य गोळा करून, वाटून, कुटून, लाटून, सुकवून कष्ट करण्याची इच्छा होत नाही. आज आपण अशी सोपी रेसिपी पाहणार आहोत ज्यात तुम्हाला फार मोजमाप करण्याची गरजही लागणार नाही. शिवाय अगदी १५ मिनिटांत तुम्ही साधारण ४० ते ५० पापड तयार करू शकणार आहात. आज आपण उरलेल्या एक वाटी भाताचे पापड कसे करायचे पाहणार आहोत. चला तर मग.

@foodwithreeta या अकाउंटवर शेअर केलेल्या या उकडलेल्या भाताचे पापड तुमचा दुहेरी फायदा करू शकतात, एक तर अर्थात आपण पाहणार आहोतच की तुम्हाला कमी कष्टात पापड बनवता येऊ शकतात. तर दुसरा फायदा म्हणजे एरवी भात उरला तर फार फार फोडणीचा भात, थालीपीठ, कटलेट अशा रेसिपी केल्या जातात ज्यासाठी खूप जास्त तेल वापरावे लागते. आज आपण जे पापड करणार आहोत ते तळताना सुद्धा जास्त तेल शोषून घेत नाहीत. अशी ही डबल फायद्याची रेसिपी पाहूया…

cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
how to make dahi vada at home recipe
Recipe : हॉटेलपेक्षा भारी दहीवडा घरच्याघरी बनवा! काय आहे साहित्य अन् रेसिपी, पाहा…
Rava Papad With Pali in Just One Cup Semolina Summer Marathi Recipes
१ वाटी रव्याचे चौपट फुलणारे पळी पापड बनवूया; तळताना तेलही शोषून घेणार नाही, पाहा सोपा Video
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

भाताचे पळी पापड साहित्य

  • १ वाटी भात
  • १ कप पाणी
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा चिली फ्लेक्स
  • चवीनुसार मीठ
  • प्लास्टिक शीट

भाताच्या पापडाची रेसिपी

एक वाटी भातात, १ कप पाणी घालून नीट वाहत्या स्वरूपातील पीठ होईल असं वाटण करून घ्या. वाटणात अर्धा चमचा जिरं आणि चिली फ्लेक्स घालून मीठ मिसळून घ्या. हे मिश्रण नीट ढवळून घ्या व मग प्लास्टिक शीटवर पळीने पापड घालून घ्या. पंख्याखाली किंवा सर्वोत्तम म्हणजे उन्हात हे पापड सुकवून घ्या. हवे तेव्हा तेलात तळून हे पापड तुम्ही खाऊ शकता.

हे ही वाचा<< १ वाटी रव्याचे चौपट फुलणारे पळी पापड बनवूया; तळताना तेलही शोषून घेणार नाही, पाहा सोपा Video

ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. सध्या दिलेले प्रमाण हे तुम्ही तुमच्याकडील सामग्रीच्या उपलब्धतेनुसार बदलू सुद्धा शकता.