सध्या भारतीय बाराजात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्मार्टफोन कंपनीमध्ये शाओमी कंपनीचा समावेश आहे. कमी पैशात सर्वात जास्त फिचर आणि चांगला कॅमेरा ही शाओमी मोबाईलची वैशिष्ट आहे. कंपनीनेने काही दिवसांपूर्वीच Redmi Note 7 हा स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी आणला होता. या फोनला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने मोबाईलची पुढची आवृत्ती आण्याचा निर्णय घेतला. या Redmi Note 7 Pro स्मार्टफोनच्या आवृत्तीची विक्री फ्लॅश सेलव्दारे करण्यात येत आहे.

२० मार्च रोजी या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल झाला होता. त्यामध्ये अवघ्या दोन मिनिटात सर्व स्मार्टफोन विकले गेले होते. देशभरातून या फ्लॅश सेलला धमाकेदार प्रतिसाद मिळत आहे. आता पुढचा सेल २७ मार्च रोजी होणार आहे. तसेच रेडमीच्या वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर याचा सेल होणार आहे. हा सेल दुपारी १२ वाजता सुरु होणार आहे. Redmi Note 7 pro चे Blue, Black आणि Red रंगातील तीन व्हरायटीचे फोन सेलसाठी उपलब्ध होते.

या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची म्हणजे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनला ६.३ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन, क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६० SoC प्रोसेसर, ३ जीबी/४जीबी/६जीबी रॅम, ३२ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज, मायक्रो एसडी कार्ड, ड्युएल कॅमरा सेटअप, ४८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा, सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ३.३ एमएम ऑडियो जॅक असे फीचर देण्यात आले आहेत