दिवाळी झाली कीचारपाच दिवसांनी राजस्थानच्या पुष्कर या छोटय़ा गावात उंटाचा बाजार भरतो. तो पाहायला भारतातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक आणि छायाचित्रकार येतात. तसं पाहिलं तर राजस्थान हे गोवा, केरळ राज्यांसारखं पर्यटनावर बऱ्यापकी अवलंबून आहे. पण तरीही हा भाग काहीसा दुर्लक्षितच वाटत आलेला आहे. माझं हे दुसरं वर्ष होतं इथे येण्याचं. इथं उंट कमी आणि छायाचित्रकारच जास्त येतात, असं म्हणतात हे साफ चुकीचं आहे. उंटांची संख्या बरीच असते. आपण जसं पाहू तसं जग दिसतं. रूक्ष वाळवंटात जगतानाही हसतमुख आणि येईल त्या संकटाला तोंड देणारी माणसं इथं दिसली आणि मी त्यांना कॅमेऱ्यात कैद करत गेलो.देशी-विदेशी पर्यटकांमुळे आणि त्यांच्या नव्या सांस्कृतिक माऱ्यातही टिकवून ठेवलेली ही पारंपरिक ओळख हीच तर आपली सांस्कृतिक शिदोरी आहे.