चैतन्य प्रेम – response.lokprabha@expressindia.com

स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचं ‘निशंक हो निर्भय हो मना रे’ हे नागपूरचे विश्वनाथ दामोदर वऱ्हाडपांडे या स्वामी भक्ताने लिहिलेले स्तोत्र तारकमंत्र म्हणून स्वामी भक्तांमध्ये आधारवत ठरलं आहे. आता एखादं स्तोत्र, एखादा मंत्र ‘तारक’ असतो, म्हणजे काय हो? तर ‘तारक’ म्हणजे तरून नेणारा, तारून नेणारा. तो तारत आहे याचाच अर्थ कोणी तरी बुडणारा असलाच पाहिजे! हे बुडणं कशातलं आहे? तर भवसागरातलं आहे. ‘भवसागर’ म्हणजे काय आणि तो कुठं असतो हो? तर भवसागर म्हणजे आमच्या भावनांचा, इच्छांचा, अपेक्षांचा समुद्र आहे. आमच्या भावना विशुद्ध नाहीत, तर मलिन आहेत. इच्छा व्यापक नाहीत, तर स्वार्थकेंद्रित आहेत आणि अपेक्षा सत्याला धरून नाहीत, तर मोह-भ्रमग्रस्त अवास्तव आहेत. ‘भवसागर’ या शब्दात ‘भव’ आहे. ‘भव’ म्हणजे होवो! काय होवो? तर जे आपल्याला हवं आहे तेच व्हावं आणि आपल्याला काय हवं आहे? तर ज्याची आपल्याला अखंड हाव आहे! तेव्हा हा लालसेचा, हावेचा, आसक्तीचा समुद्र आहे कुठे? तो आपल्या मन, चित्त, बुद्धी आणि अहंरूपी अंतकरणातच पसरला आहे. अंत:करणाची खोली किती? लांबी किती? तर अपरंपार! जिथे हाव आहे तिथे भय आलंच पाहिजे. तेव्हा हा नुसता भवसागर नाही, तो भयसागरही आहे! हा ओलांडणं माणसाच्या आवाक्यात नाही. जितका म्हणून माणूस स्वबळावर तो तरण्याचा प्रयत्न करील तितका तो त्यातच गटांगळ्या खात राहील. त्यामुळे जोवर सद्गुरूभक्तीचं गंगाजल अंतकरणाच्या भवडबक्यात पडत नाही, तोवर आंतरिक शुद्धीची प्रक्रिया सुरूच होणार नाही. ती प्रक्रिया सुरू करणारा, भय कमी करणारा आणि भ्रामक भावनेच्या लाटांच्या तडाख्यातून वाचविणारा जो मंत्र वा स्तोत्र असतं, त्याला ‘तारक’ हा दर्जा आपोआप प्राप्त होतो. कारण हा मंत्र वा हे स्तोत्र साधकाला भवदुखातून तारून नेत असतं. पण साधकाला तो ज्या व्यापक भवदुखात अडकला आहे ना, त्याची जाणीवच नसते. तो आता पुढय़ात आलं आहे तेवढंच दुख पाहत असतो. तेच दुख त्याला मोठं वाटत असतं, भयंकर वाटत असतं. त्या दुखाची कारणपरंपरा ज्या व्यापक भवदुखात असते त्याची त्याला जाणीवही नसते. आता कोणी आजारी पडला, कोणी आíथक संकटात सापडला, कोणी अपयशी ठरला तर ते संकट दूर व्हावं, यासाठी काही जण हनुमंताला आळवतात. ‘संकटमोचन स्तोत्रा’चे पाठ करतात. त्या स्तोत्रात अखेरीस विनवणी आहे की, ‘‘बेगि हरो हनुमान महाप्रभु जो कछु संकट होय हमारो। को नहि जानत है जग में कपि संकटमोचन नाम तिहारो॥’’ म्हणजे, ‘‘हे हनुमंता, वेगानं ये आणि आमचं जे काही संकट असेल, ते दूर कर. कारण तू संकटमोचक आहेस, संकटाचं निवारण करणारा आहेस हे जगात कोणाला माहीत नाही?’’ आता हनुमानाला वाटतं की जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकण्याइतकं मोठं दुख, मोठं संकट दुसरं नाही. तेव्हा तेच दूर करावं! पण आपल्याला इतकं मोठं संकट दूर करायचं नसतं! आता जो रुग्णालयात अंथरुणाला खिळला आहे तो खडखडीत बरा व्हावा, ज्याचा धंदा बुडाला आहे त्याला एकदम बरकत यावी, जो परीक्षेत अनुत्तीर्ण झाला आहे तो पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण व्हावा, अशा आपल्या मोजक्या अपेक्षा असतात. तेव्हा समोरच्या संकटानं घाबरायचं, पण त्या संकटाची मूळ कारणपरंपरा दूर करण्यासाठी अनुत्सुक राहायचं, ही सवय लागलेल्या माणसाला स्वामींना आधार द्यायचा आहे. त्याचं आताचं संकट दूर करतानाच मूळ मोठय़ा संकटाचं भान त्याला आणायचं आहे. त्या संकटातही पाठीशी असलेल्या सद्गुरू-शक्तीबद्दल त्याला सचेत करायचं आहे. म्हणून या तारक मंत्राच्या तिसऱ्या कडव्यात सुरुवातीलाच म्हटलं आहे की,

Heartfelt sorrow by Chhatrapati Shahu Maharaj, Rajavardhan Kadambande , Rajavardhan Kadambande calls himself Rajarshi Shahu s heir, Chhatrapati Shahu Maharaj give reply to Rajavardhan Kadambande, Kolhapur news, marathi news, rajashri shahu maharaj news, lok sabha 2024,
राजवर्धन कदमबांडे राजर्षी शाहूंचे वारसदार म्हणवतात याचे मनस्वी दु:ख; छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिउत्तर
Hindutva of Congress and BJP on the occasion of Ram Navami
रामनवमीचे औचित्य साधून हिंदुत्व काँग्रेसचे अन् भाजपचे…
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

उगाची भितोसी भय ते पळू दे।

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे॥

आपण तिसऱ्या कडव्याचं चिंतन पूर्ण करून चौथ्या कडव्याकडे वळलो असताना परत तिसऱ्या कडव्याच्या पहिल्या चरणाचा विचार का करीत आहोत? हे उमगण्यासाठी चौथं कडवं पुन्हा वाचू. या कडव्यात म्हटलं आहे की,

खरा होई जागा तू श्रद्धेसहित

कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त

कितीदा दिला बोल त्यांनीच हात

नको डगमगू स्वामी देतील साथ॥४॥

आता ही श्रद्धेसहित जाग येण्यासाठी, न डगमगण्यासाठी ‘जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे’, म्हणजेच आपल्या पाठीशी असलेली स्वामी समर्थाची शक्ती कळणं आणि अनुभवणं आवश्यक आहे ना? त्या दृष्टीनं विचार करता चौथ्या कडव्याचा सांधा तिसऱ्या कडव्यातील पहिल्या चरणाशी जुळतो, हे लक्षात येईल. आता भक्ताच्या, साधकाच्या सतत जवळ स्वामींची म्हणजेच सद्गुरूंची शक्ती असते, ती कशी? यासाठी स्वामींच्या चरित्रातला एक प्रसंग पाहू.

गोपाळबुवा केळकर यांनी लिहिलेल्या समर्थाच्या बखरीतला वामनबुवा बडोदकरांच्या रोगपरिहाराचा प्रसंग आधी आपण पाहू, मग त्याच्या आध्यात्मिक अर्थाचं चिंतन करू. तर प्रसंग संक्षेपानं सांगायचा तर, असा आहे-

शके १७९८ वैशाख शुद्ध चतुर्थीपासून वामनबुवा बडोदकर यांचे मूत्रकृच्छ, खोकला, आमांश, संधिवात, शरीरदाह, नेत्ररोग, मूळव्याधी वगरे रोग बलवान झाले. ते बडोद्यास सुरसागराचे काठी राहात होते. घरातील सर्व मनुष्यांस रात्रंदिवस चन नसून अन्नपाणी गोड लागेना. बुवांची तर वाचण्याची आशा नाही, असे सर्व वैद्यांनी सांगितले. पाच-पाच मिनिटांनी शौचास जावे लागे. अन्न सुटले. अंथरुणावरून उठण्याची शक्ती नाही. चित्तास क्षणभर चन नाही. झोप नाही! परंतु श्रीसमर्थाचे स्मरण सुटले नाही. अक्कलकोटास पत्र पाठविले की, ‘‘बरे होण्याचा प्रसाद मिळून उत्तर यावे!’’ दहा-बारा दिवसांत पत्राचे उत्तर नाही. कोणाचेही औषध घेतले म्हणजे जास्त व्हावे, असे असता ते विवेकी असल्याकारणाने इतक्याही स्थितीत न घाबरता विचार करीत की, या दुखभोगांनी प्रारब्धाचाच क्षय होत आहे! परंतु अति दुखणे असल्याकारणाने केव्हा देहबुद्धीवर येत. परंतु विवेकही जागा असल्याकारणाने ती देहबुद्धी त्यास फारशी घायाळ करीत नसे. असे होता होता अशा स्थितीत जगण्यापेक्षा प्राणायाम करून सुरसागरात जलसमाधी घ्यावी, असा विचार मनात आला. रात्री बारा वाजता सर्व निजले असे पाहून, सुरसागरात उतरत आहेत इतक्यात दीनदयाळ अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थानी प्रत्यक्ष येऊन हात धरून वर ओढले. अतिशय रागाने दोन थापटय़ा मारून भक्तवत्सल, भक्ताभिमानी स्वामी त्यास म्हणाले की, ‘‘शहाण्या, गाढवा, आयुष्य असून का मरतोस? तुझे भोग भोगल्याविना सुटतील काय? आम्हावर त्रागा करतोस काय? सहजसमाधी सोडून जलसमाधी कसली बोडक्याची घेतोस?’’ असे म्हणून महाराजांनी त्यांस घरात आणून सोडले. त्याचे उरावर हात फिरवून, ‘‘बरे होईल, उगाच बस, चेष्टा (वेडेपणा) करू नकोस नाही तर पायपोस (चप्पल) खाशील!’’ असे बोलत बोलत सर्वातर्यामी महाराज कुठे दिसेनासे झाले. एक महिन्यात बुवांना रात्रंदिवस झोप नव्हती. बिछान्यावर पडताच दयासागरांचे गुणस्मरण करता करता गाढ झोप लागली. प्रातकाली जागे होऊन पाहतात तो बहुतेक व्याधी नाहीशा झालेल्या. मनाला आराम वाटला. नंतर दहा वाजता अक्कलकोटहून प्रसादासह बरे होण्याचे (आशीर्वाद देणारे) पत्र आले. मग त्या धर्यानंदाने सर्वास संतोष जाहला. प्रकृती बरीच सुधारली, परंतु हात, पाय आणि कंबर यातला संधिवायू गेला नाही. समर्थाची सूचना आली की, ‘‘कुरुक्षेत्री आल्यावर निशेष बरे होईल!’’ अशी सूचना आल्यावर मग लागलीच मार्गशीर्ष शुद्ध ११ सोमवारी निघून रेल्वे मार्गाने अक्कलकोटास आले. मात्र महाराज मंदरगीस गेले होते. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवारी तीन वाजता श्रीसमर्थाची स्वारी अक्कलकोटास आली. वामनबुवांचा आनंद गगनात मावेना. हजारो लोक दर्शनास जात आहेत. वामनबुवा काठी टेकीत टेकीत श्रीसमर्थ चरणी जाऊन साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले. तर महाराज म्हणाले, ‘‘का हो बुवा? कुव्यात जीव देत होतात ते तुम्हीच काय? तुमचा सुरसागर कोरडा होता ना?’’ असे म्हणून हसले. त्या दिवसापासून आठ दिवसांनी वामनबुवांचा संधिवायू जाऊन प्रकृती निशेष बरी झाली.

आता वरील प्रसंग वाचून, जे साधनारत नाहीत किंवा सद्गुरू मार्गात नाहीत अशांच्या मनात स्वाभाविकपणे अनेक प्रश्न निर्माण होतील. कोणी जीव द्यायला जात असताना त्याचा सद्गुरू प्रकट होऊन अडवतो कसा? शरीराचे रोग असे कुणाच्या कृपेनं बरे होतात किंवा होऊ शकतात का, असे काही प्रश्न तीव्रपणे मनात रुंजी घालतील. साधनी आणि भक्तांना या लीलाप्रसंगामध्ये कृपेचा आश्रय जाणवतो. पण त्या प्रश्नांच्या दृष्टीनेही या प्रसंगाचं चिंतन केलं तरी खूप काही गवसतं. पुढील भागात त्याचा विचार करू.