पाश्चात्त्यांची विज्ञाननिष्ठा व संशोधक वृत्ती आपल्या मुलांमध्ये लहान वयातच निर्माण व्हावी, या उद्देशाने मुरलीधरपंत कुलकर्णी यांनी ही पुस्तकनिर्मितीची संकल्पना मांडली व गौरी गंधे यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारली. मुलांना विज्ञानाचा अभ्यास कंटाळवाणा, रूक्ष व किचकट वाटू नये म्हणून तो मनोरंजनाच्या माध्यमातून मांडण्यासाठी ‘युरेका क्लब’ ची निर्मिती झाली.
विज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अश्विनीताईने वेगवेगळ्या वयोगटांतल्या काही मुलांना एकत्र करून गप्पाटप्पा करत त्यांना शास्त्रज्ञांची माहिती द्यायची अशी या क्लबमागील कल्पना होती. कधी ताई माहिती देत असे; तर कधी ती मुलांना माहिती मिळवून सांगायला लावत असे. कधी खाऊ खात, कधी सहलींना जाऊन, कधी चेष्टा-मस्करी करत या सगळ्या माहितीची देवाण-घेवाण चालत असल्यामुळे मुले कंटाळत तर नसत; उलट कधी ताईकडे जायची वेळ येते आहे याची उत्सुकतेने वाट पाहत असत.
युक्लिड यूलरसारखे गणितज्ञ; कोपíनकस, गॅलिलिओसारखे खगोलशास्त्रज्ञ, न्यूटन, एडिसन, गॅहेम बेल यांच्यासारखे भौतिकशास्त्रातले शास्त्रज्ञ, डार्वनि, पाश्चर यांच्यासारखे जीवशास्त्रज्ञ, रूदरफोर्ड व डाल्टन यांच्यासारखे रसायनशास्त्रज्ञ, फ्रॉइडसारखे मानसशास्त्रज्ञ इत्यादी विविध क्षेत्रांतल्या अनेक शास्त्रज्ञांची, त्यांच्या संशोधनाची माहिती या गप्पांमध्ये रंजक स्वरूपात येते. अभ्यासाच्या पुस्तकांची अनिवार्यता व त्यामुळे येणारे लादलेपण या पुस्तकातून सहज टाळले जाते व स्वत:च्याही नकळत मुले यांमध्ये गुंतून जाऊ शकतात, इतक्या सहजपणे हे लिहिले गेले आहे.
मुलांमध्ये रमून जाणारी व त्यांच्या चौकस वृत्तीला खतपाणी घालत त्यांना माहिती देणारी व तितक्याच सहजपणे त्यांच्याकडून माहिती काढून घेणारी अश्विनीताई; एकमेकांच्या खटय़ाळपणे खोडय़ा काढणारी, सतत प्रश्न विचारणारी आणि खुसखुशीत थट्टामस्करी करणारी मुले यांच्यामुळे हा ‘युरेका क्लब’ जिवंत होऊन जातो.
य पुस्तकातून अनेक शास्त्रज्ञांची माहिती अगदी सहजपणे मिळते. हेच या पुस्तकाचे महत्त्व आहे.
‘युरेका क्लब’ गौरी गंधे, रोहन प्रकाशन,
पृष्ठे- १३१, किंमत – १०० रुपये
शिरीन कुलकर्णी

generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!