मागच्या लेखात आपण लग्नाच्या बैठकीपर्यंत आलो होतो. जर ती बैठक काही कारणांनी मोडली असती- म्हणजे लग्नसंबंध होऊ  शकत नाही असं ठरलं असतं- तर हा पुढचा लेख लिहिण्याची सोय उरली नसती. त्यामुळे बैठक यशस्वी ठरली. आणि आता दोन्ही बाजूची माणसं पुढच्या तयारीला लागली.

आता लग्न करायचं हे ठरल्यानंतर पहिल्यांदा काय होतं? पहिल्यांदा म्हणजे बैठक संपवून एका पक्षाची मंडळी घरी निघाली की लगेच आलेल्या लोकांची टिंगलटवाळी.

MHADA Mumbai , MHADA Mumbai Extends Deadline for e auction Tender Process, Deadline for e auction Tender Process of 17 Plots in Mumbai, mhada 17 plots auction in mumbai Tender Process , mhada mumbai, mumbai news, e auction tender, mhada e tender 17 plots Extends Deadline,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई लिलावाच्या निविदेस ७ मे पर्यंत मुदतवाढ
The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
MHADA e-auction shops Mumbai
म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव लांबणीवर; नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ

‘‘मुलाचा काका जरा जाडाच आहे, नाही?’’

‘‘जरा? खुर्चीत असा फिट्ट बसला होता! वाटलं, आता जाताना ती बरोबरच घेऊन जातोय की काय?’’

‘‘आणि ते ‘गुलाबपाणी उडवू आल्या-गेल्यावर..’ असं म्हटल्यावर तुम्ही ‘केशरही टाकू थोडं..’ म्हणालात. हुमायून बादशहा आहात की काय लग्नात केशरपाणी उडवायला?’’

‘‘बरं! साधं गुलाबपाणी उडवू!’’

‘‘मुलाची आईच बोलत होती सगळं. वडील मूग गिळून गप्प बसले होते. म्हणजे मातृसत्ताक आहे घर.’’

‘‘आपल्यासारखं.’’

‘‘मी बोलू देत नाही तुम्हाला?’’

‘‘तो वाद नंतर. आता लग्नाचा हॉल बघू या पहिल्यांदा.’’

‘‘हो! आपल्या घराच्या जवळच आहे तो.’’

‘‘चालेल. तो उत्तम! जवळच्या जवळ!’’

‘‘तो नको.’’

‘‘का?’’

‘‘सगळी इथेच येऊन तळ ठोकतील. दूरचा असला की सगळे कसे अच्चळ तिथल्या तिथे आले आणि गेले असं होईल. जरा डोकं चालवा हो.’’

‘‘दूरचाच बघू.’’

मग दूरचा हॉल ठरतो. पत्रिका छापायची जबाबदारीही पार पडते. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत पत्रिका छापल्या जातात. कधी कधी वरचा देवीचा फोटो उलटा छापला जातो. पण ते कोणाच्याही लक्षात येत नाही. मग जेवण आणि अल्पोपाहार यासाठीचा केटरर भेटायला येतो. मुलीचे वडील दरवाजा उघडतात.

‘‘नमस्कार! आपण लग्न करताय असं कळलं.’’ हे ऐकल्यावर मुलीची आई आकांत करते.

‘‘काय हो! काय ऐकत्येय मी? केसानं गळा कापलात माझा. कोण आहे ही बया? मला संशय होताच. आता खात्रीच पटली. घरात मुलीचं लग्न काढलंय आणि आता स्वत: गुढग्याला बाशिंग बांधून उभे राहिलात?’’

वडील या सगळ्याने गडबडून जातात. समोर आलेल्या अनोळखी माणसासमोर चाललेला हा आकांत आवरायचा कसोशीने प्रयत्न करतात.

‘‘अगं ए! कोण करतोय लग्न? इथे पहिला संसार करता करता जीव अर्धा झालाय माझा. या वयात माझी मुंजसुद्धा लावायला कोणी भटजी तयार होणार नाही. हे कोण जे आहेत त्यांना आयुष्यात पहिल्यांदा बघतोय मी. काय हो! कोणी सांगितलं तुम्हाला? अगं! खोटं बोलताहेत ते.’’

‘‘काही सांगू नका. त्या शेजारच्या खडपेकर वहिनींना सारख्या ऑफिसातून पिन्स, पेन्सिली आणि खोडरबर आणून देता, त्यावरून मला अंदाज यायला हवा होता. पण गाफील राहिले मी. आणि आज घात झाला माझा.’’

‘‘ए! उगाच गाफीलबिफील शब्द वापरू नकोस. इथे काय मुशायरा चाललाय? आणि पिन्स, पेन्सिली आणि खोडरबर देऊन जर लग्नं होत असती तर स्टेशनरीच्या दुकानदारांनी जनानखाने ठेवले असते. तू जरा शांत हो. साहेब! आपण कोण? नाव काय आपलं? कोणी सांगितलं तुम्हाला मी लग्न करतोय?’’

‘‘माझी माहिती खोटी ठरणार नाही. प्राजक्ता लग्न करत्येय असं मला पक्कं कळलेलं आहे.’’

‘‘खडपेकरबाईंचं नाव प्राजक्ता आहे का हो? बोला ना!’’

‘‘काय बोलू? जरा शुद्धीवर या! प्राजक्ता आपल्याच मुलीचं नाव आहे. तुझी मावशी नव्हती म्हणाली, ‘कुर्र्र प्राजक्ता असं करून नाव ठेवा. ’आणि हे सांगताना माझ्या कानात तिनं इतक्या जोरात कुर्र्र केलं, पुढे तीन-चार दिवस कोणीतरी कानात मोटारसायकल चालवतंय असं वाटत होतं. आठवतंय ना तुला? जरा तू ऐक माझं. आणि अहो साहेब! अजून तुम्ही कोण, काय मला काहीही कळलेलं नाहीये.’’

‘‘सांगतो ना! मी भातणकर! तृप्तता केटर्स ही माझी कंपनी आहे. तुमच्या मुलीचं लग्न जिथे होणार आहे त्या हॉलला माझी मोनोपॉली आहे. पुढचं सगळं ठरवण्यासाठी मी आलोय.’’

‘‘लग्न दोन आठवडय़ांनी आहे. आत्ता काय काम आहे?’’

‘‘वेळ हा-हा म्हणता निघून जाईल. तेव्हा त्या दिवशी जे काय तुम्हाला हवंय त्याबद्दल आपण बोलून घेऊ. तुम्ही सांगाल ती व्यवस्था आम्ही चोख करून देऊ.’’

‘‘त्याआधी तुला विचारतो- संशय फिटला तुझा?’’

‘‘कसला संशय? माझ्याशी झालं तुमचं लग्न तेच खूप झालं. तुम्हाला पसंत केलं तेसुद्धा घरच्यांना आवडलं नव्हतं. चांगला गेंडय़ांच्या जंगलातला फॉरेस्ट ऑफिसर मुलगा सांगून आला होता. पण नाही! तेव्हा अक्कल कुठे गेली होती माझी देव जाणे!’’

‘‘सकाळी दाढी केल्ये मी. परत नको आता तुझ्याकडून बिनपाण्याने.’’

‘‘साहेब! माझ्या वेळेला खूप किंमत आहे. तुम्ही नंतर भांडलात तर सगळ्यांसाठी जास्त बरं नाही का?’’

‘‘सॉरी! हा भातणकर, बोला!’’

‘‘आमच्या सगळ्या गोष्टी अत्यंत uniqueआहेत. सकाळी मामाने फोडायच्या नारळापासून ते रात्री निघताना ग्लिसरीनपर्यंत सगळं देतो आपण.’’

‘‘ग्लिसरीन कशाला?’’

‘‘हल्ली मुली पूर्वीसारख्या रडत नाहीत. खोटं रडायला उपयोगी पडतं. चांगली दोन-तीन दिवस रडेल तुमची मुलगी. बरं, फेटे बांधायचे आहेत?’’

‘‘अहो! पोवाडय़ांची स्पर्धा नाहीये, लग्न आहे माझ्या मुलीचं.’’

‘‘साहेब! आजकालची पद्धत आहे. अगदी घट्ट फेटे बांधतो आम्ही. आठ सेकंदांत एक असा स्पीड आहे आमच्या कारागिराचा. सुटला तर पैसे परत. रिसेप्शनला नवरा-बायकोला खोटं खोटं हसायचं ट्रेनिंगसुद्धा देतो. अहो! किती माणसं येतात. हसायचं तरी किती? शिवाय तुमचा सामाजिक दर्जा वाढवायचा असेल तर सूट घालून इकडे तिकडे फिरणारी माणसंही पुरवतो आम्ही. सध्या स्कीम चालू आहे- तीनवर एक सूट फुकट. जावई कुठला आहे?’’

‘‘इथलाच.’’

‘‘मग प्रश्नच मिटला. नाही तर ज्या जिल्ह्यत राहत असेल तिथलं लोकल पाणी पुरवतो आम्ही सकाळी पाय धुवायला.

‘‘ते सगळं ठीक आहे. मेनूबद्दल सांगाल का?’’

‘‘कसे जेवणार?’’

‘‘म्हणजे? तुम्ही-आम्ही जेवतो तसे.’’

‘‘तसं नाही. पंगत की ब्युफे?’’

‘ब्युफेच ठेवू. काय गं?’’

‘‘पंगत!’’

‘‘बरं. पंगत ठेवा भातणकरसाहेब!’’

‘‘ठीक आहे. पंगत! वाढपी कुठल्या कपडय़ांत हवेत? पेशवाई? मोगलाई? साऊथ इंडियन? परवा रोमन कपडय़ांतले वाढपी होते. रिसेप्शनला ‘क्लिओपात्रा’ सिनेमासारखा सेट लावला होता. टू द लास्ट डिटेल.. सीझरच्या खुनाचा सीनसुद्धा केला होता दर तासाला. आमच्या टिक्का बनवणाऱ्या वस्तादाने असा सुरा भोसकला आमच्या        सीझरच्या पाठीत. पाहुणे एकदम फ्लॅट झाले. आपण तुमच्यासाठी गोकुळचा सेट लावू. मस्त दुधाचं कारंजं, लोण्याचे हंडे आणि रिसेप्शनला कंसवध ठेवू.’’

‘‘काय मेनू आहे तुमचा?’’

‘‘चौपन्न प्रकार आहेत. तुम्हाला कुठला हवाय?’’

‘‘दुसऱ्या दिवशी पोट बिघडणार नाही असा ठेवू.’’

‘‘ठीक आहे. पनीर मक्खनवाला, बिहारी दाल, तवा सब्जी, वेज मंचुरियन ठेवू या आणि कुलचा.’’

‘‘भातणकर! लाज वाटते का? कुलटा कोणाला म्हणालात?’’

‘‘वहिनी! कुलटा नाही कुलचा. कुलचा, शिवाय रुमाली रोटी. एका बाजूला पास्ता, नुडल्स, पाणीपुरी, भेळपुरी, डोसाबिसा, शिवाय कचोरी, सामोसे वगैरे फरसाण आयटम ठेवू या. हुक्काबिक्कासुद्धा पुरवतो आम्ही.’’

‘‘हुक्का? आम्ही परब आहोत, अरब नाही. आणि या मेनूत एकही मराठी पदार्थ नाहीये.’’

‘‘साहेब! वहिनी! मराठी माणसाच्या लग्नात हल्ली हाच मेनू असतो. आपले महाराष्ट्रीयन पदार्थ ठेवले तर मग ते जरा down market वाटतं. आणि हो! सॅलडचा देखावा ही आमची खासियत आहे.’’

‘‘सॅलडचा देखावा? म्हणजे?’’

‘‘एखादी थीम घेऊन आम्ही जेवणाच्या टेबलवर फळं कोरून सॅलड बनवतो. मागच्या महिन्यात एका लग्नात आम्ही पानिपतच्या युद्धाचा देखावा ठेवला होता सॅलड म्हणून. म्हणजे- गाजरं म्हणजे अहमदशाह अब्दालीची माणसं. का विचारा? कारण अफगाणी लोक लालबुंद असतात. आणि मराठी सैन्य उरलेल्या फळांपासून बनवलं होतं. कांद्याच्या पातींनी तोफा बनवल्या होत्या आणि मुळ्याचे घोडे बनवले होते. चांगलं बावीस फूट लांब.’’

‘‘बावीस फूट? मग बिल मिळालं जेवणाचं? की पानिपतात सदाशिवरावभाऊ  नाहीसे झाले तसं तुमचं गिऱ्हाईकसुद्धा पळून गेलं?’’

‘‘पळून? खूश झाले ते! सगळी गाजरं फस्त केली लोकांनी. त्या युद्धात जरी मराठे हरले असले तरी आमच्या मेनूत अफगाणी लोकांचा सर्वनाश झाला. बरं, सिनेमांच्या गाण्याच्या चालीवर मंगलाष्टक हव्येत?’’

‘‘नाही! साधीच ठेवणार आहोत आम्ही!’’

‘‘बघा! हल्ली ‘लॉरीवाला नवरा हवा’ या गाण्यावर आम्ही ‘तदेव लग्नं’ बसवलंय. बरं, वरात हव्ये घोडय़ावरून? डर्बीत धावलेले घोडे ही आमची स्पेशालिटी आहे.’’

‘‘नको! भातणकर! आयुष्यभर धावतोय, पण कशातही जिंकलो नाहीये. बरं, तुमचे दर काय आहेत?

‘‘तुमची माणसं किती?’’

‘‘हजार धरा.’’

‘‘दीड हजार होतील.’’

‘‘म्हणजे दीड रुपया ताट?’

‘‘प्रत्येकी दीड हजार!’’

‘‘बाप रे! थोडं महाग आहे!’’

‘‘एक आयडिया आहे. मुलीला पळून जाऊन लग्न करायला सांगा. सगळाच खर्च वाचेल.’’

आता शेवटी येईल तो लग्नाचा दिवस! त्या दिवशी काय काय होतं, ते पुढच्या भागात.

 

– संजय मोने

sanjaydmone21@gmail.com