News Flash

मुंबई गोवा महामार्गावर अपघात; २ जखमी

मुंबई–गोवा महामार्गावर पेणजवळील हमरापूर फाटा येथे आज सकाळी दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर स्फोट झाला.

| May 24, 2015 10:31 am

मुंबई गोवा महामार्गावर अपघात; २ जखमी

मुंबई–गोवा महामार्गावर पेणजवळील हमरापूर फाटा येथे आज सकाळी दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. सकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली.
पेण – हमरापूर फाट्याजवळ दोन ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या धडकेत सिलेंडर वाहून नेणा-या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. सिलेंडरचे तुकडे सुमारे १०० फुटांपर्यंत उडाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात दोन जण जखमी झाले.
पेण-हमरापूर फाट्यावरच हा अपघात झाल्याने मुंबईच्या दिशेला येणाऱ्या आणि गोव्याच्या दिशेला जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक पेण-खोपोली बायपास मार्गे वळवण्यात आली आहे, तर गोव्याकडे जाणारी वाहतूक पळस्पे मार्गे खोपोली ते पाली वाकण मार्गे महाड गोवा मार्गावर वळवण्यात आल्याचे, वाहतूक पोलीस निरिक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2015 10:31 am

Web Title: accident at mumbai goa highway 2 injured
टॅग : Blast
Next Stories
1 मुंबई मनपा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढवणार!
2 भाजपच्या शिडात स्वबळाचे वारे
3 युती तुटल्याने भाजपला स्वत:ची ताकद समजली
Just Now!
X