महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी नियोजित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नव्या अर्ज प्रणालीवरील खाते अद्ययावत करण्यात अडचणी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने काही सूचना दिल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी झाल्या. आता प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवाराची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ अंतर्गत ‘Admission Certificate’ या मेनूमध्ये तसेच आयोगाच्या अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील ‘Guidelines For Candidate’ अंतर्गत ‘Download Admission Certificate’ या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

  • अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करून प्रवेश प्रमाणपत्राचा संक्षिप्त तपशील पाहता येईल. तसेच प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करता येईल.
  • अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करुन प्रवेश प्रमाणपत्राचा संक्षिप्त तपशील पाहता येईल. तसेच, प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करता येईल.
  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळांवरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० करीता दिनांक ५ एप्रिल, २०२१ रोजी उपलब्ध करुन देण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी नियोजित परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजीच्या परीक्षेच्या प्रवेश प्रमाणपत्रासह परीक्षेस उपस्थित होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
  • परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
  • कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
  • प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-secretap@ mpsc.gov.in व support-onlino@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेतआवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल.

maharashtra state examination council marathi news
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी मात्र नाही, कारण काय? जाणून घ्या
interim result of the fifth and eighth scholarship examination has been announced
पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
ugc net exam marathi news, ugc net exam online application form marathi news
‘युजीसी नेट’ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाहीर, कधी होणार परीक्षा?
State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर