26 February 2021

News Flash

गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत

शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही  विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे

गोंडी भाषा शाळेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित विद्यार्थी.

जिल्ह्यतील शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक गोष्ट घडून आली आहे. धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली आहे.

अंगणवाडी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांची ही शाळा गोंडी बोलीतून आदिवासी विद्यार्थ्यांना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारे केंद्र ठरणार आहे. शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही  विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे देणार आहे. ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल’ या नावाने धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील २४४ (१), ३५० (क) आणि १३ (३) (क) या कलमांमधील तरतुदीनुसार ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये ही शाळा सुरू करण्यात आली.  या शाळेचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी व गोंडी समाज सेवक गणेश हलामी, देवसाय पाटील आतला  उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:00 am

Web Title: gadchiroli is the first gondi language school in the state abn 97
Next Stories
1 अमरावतीत २३ तर अकोल्यात ३९ दिवसांत रुग्णदर दुप्पट
2 वर्धा – करोना नियंत्रणासाठी टाळेबंदीची गरज नाही जिल्हाधिकाऱ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
3 संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ?; पोहरादेवी येथील गर्दीबाबत तत्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्याचे आदेश
Just Now!
X