News Flash

सराफ व्यावसायिकांचा आजपासून तीन दिवस संप

केंद्र सरकारने सराफ व्यावसायीकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ गेल्या १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता.

महाराष्ट्र सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या नगरमध्ये झालेल्या राज्यस्तरिय बैठकीत, केंद्र सरकारने अबकारी कायद्यात कोणतीही तडजोड केली नसल्याने सोमवारपासून पुन्हा तीन दिवसांचा राष्ट्रीय बंद पुकारण्याचा तसेच उद्याच दिल्लीत संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फत्तेचंद राका यांनी जाहीर केला.

केंद्र सरकारने सराफ व्यावसायीकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ गेल्या १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता. सरकारने यातुन मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर १३ एप्रिलला संप तात्पुरता मागे घेतला. या पाश्र्वभूमीवर नगरला संघटनेची राज्यस्तरिय बैठक झाली. त्यात तीन दिवसांचा राष्ट्रीय संप पुकारण्याचा व संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:47 am

Web Title: jewellers strike 2
Next Stories
1 टंचाई योजनांना निधीची प्रतीक्षा!
2 धुळ्यात उद्या डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत पाणी परिषद
3 तरुणांनी स्पर्धा परीक्षांचे तंत्र आत्मसात करावे
Just Now!
X