News Flash

नागपूर मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात

सर्वाचे लक्ष लागलेल्या नागपूर मेट्रो रेल्वेच्या कामाला रविवारी नागपुरात सुरुवात झाली.

| June 1, 2015 02:31 am

सर्वाचे लक्ष लागलेल्या नागपूर मेट्रो रेल्वेच्या कामाला रविवारी नागपुरात सुरुवात झाली. निर्धारित वेळेनुसार या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास मुंबईनंतर राज्यात नागपूर हे मेट्रो रेल्वे सुरू होणारे प्रथम शहर असेल.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाचे भूमिपूजन यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा प्रकल्प सुरू होणार किंवा नाही, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, प्रकल्पाच्या कामातील सर्व  अडथळे केंद्र व राज्य सरकारने दूर केल्याने अल्पकाळातच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ४.५ कि.मी. परिसराच्या कामाला सुरुवात केली जाईल. एकूण ८५ कोटींचे हे काम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 2:31 am

Web Title: nagpur metro work in progress
टॅग : Nagpur Metro
Next Stories
1 यवतमाळमध्ये अपघातात सहा ठार
2 सूर्य कोपलेलाच..
3 राज्याभिषेकदिनी रायगडावर उत्साही शिवभक्तांची गर्दी
Just Now!
X