26 February 2021

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये बोअरवेलमधून पाण्याऐवजी येतंय पेट्रोल

भाताला पाणी देत असताना तळेकर यांच्या पाण्याच्या पाईपमधून पेट्रोल येत असल्याची गोष्ट लक्षात आली.

वाढत्या इंधन दरामुळे विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे आपल्या हातात नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. आता राजस्थानमधील एका मंत्र्याने तर सर्वसामान्यांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

पिंपरी-चिंचवड : पेट्रोलचे दर मागील काही दिवसांपासून गगनाला भिडले असल्याने सामान्यांना त्याची झळ बसत आहे. विरोधकांनी अनेक आंदोलने करुनही काहीही फरक पडला नसून दरवाढीवर नियंत्रण आलेले नाही. असे असतानाच एक आश्चर्याची बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडकरांना पेट्रोलच्या बाबतीत अच्छे दिन आले आहेत. याचे कारण म्हणजे शहरातील डुडळगाव येथे चक्क बोअरवेल पाण्याऐवी पेट्रोल येत आहे. आता हे असे कसे काय याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर तांत्रिक बिघाडामुळे हे झाले आहे. या अनोख्या गोष्टीमुळे गावकऱ्यांमध्ये सध्या एकच चर्चा सुरु आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील डुडळगाव येथे एका शेतकऱ्याच्या बोअरवेलमधून चक्क पेट्रोल निघत आहे. या प्रकरणाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने याची पाहणी केली. ही बोअरवेल शिवाजी तळेकर यांची असून त्यांची भातशेती आहे. भाताला पाणी देत असताना तळेकर यांच्या पाण्याच्या पाईपमधून पेट्रोल येत असल्याची गोष्ट लक्षात आली. मग थोडा शोध घेतल्यानंतर शेजारी भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप असून पेट्रोलची साठवणूक करणाऱ्या टाकीला गळती लागल्याने हे झाल्याचे लक्षात आले. पंपात जमिनीमध्ये असणाऱ्या टाकीतून पेट्रोल जमिनीमध्ये झिरपले. आणि मातीतून ते अवघ्या ९० ते १०० मीटर अंतरावर असलेल्या तळेकर यांच्या शेतातील बोअरवेलमधून पाण्यासोबत येऊ लागले.

आता हे पेट्रोल येणे बंद झाले असून पेट्रोलमुळे तळेकर यांची मोटार जाम झाली आहे. यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे तळेकर यांनी सांगितले आहे. पेट्रोल पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने सध्या हा पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आला आहे. गावातील नागरिकांनीही शेतातील बोअरवेलमधून येणारे पेट्रोल पाहण्यासाठी गर्दी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 6:09 pm

Web Title: petrol from borewell in pimpri chinchwad shivaji talekar farm
Next Stories
1 स्वामी अग्निवेश यांचे मोहन भागवतांना खुल्या चर्चेचे आव्हान
2 आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाचा पुण्यात मूक महामार्चा
3 सत्ताधाऱ्यांकडून हिंसक घटनांना प्रोत्साहन, स्वामी अग्निवेश यांची भाजपावर टीका
Just Now!
X