News Flash

मुरुड नगर परिषद शिक्षण मंडळ सभापतिपदी प्रकाश सरपाटील यांची निवड

मुरुड नगर परिषदेच्या शिक्षण मंडळच्या सभापतिपदाची निवडणूक आज पार पडली. या वेळी शिक्षण मंडळातील ११ सदस्य उपस्थित होते. सभापतिपदासाठी प्रकाश सरपाटील यांचा एकच अर्ज आल्याने

| April 26, 2013 04:29 am

मुरुड नगर परिषदेच्या शिक्षण मंडळच्या सभापतिपदाची निवडणूक आज पार पडली. या वेळी शिक्षण मंडळातील ११ सदस्य उपस्थित होते. सभापतिपदासाठी प्रकाश सरपाटील यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.     या वेळी नगराध्यक्षा कल्पना पाटील आणि मुख्याधिकारी बाळासाहेब जगताप उपस्थित होते. प्रकाश सरपाटील यांच्या निवडीबद्दल कल्पना पटील यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षण सभापतिपद निवडीचे सर्व अधिकारी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना देण्यात आले होते. त्यांनीच सरपाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सरपाटील शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी चांगले काम करतील, असा विश्वास नगराध्यक्षा पाटील यांनी व्यक्त केला.
तर शिक्षण मंडळाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचे आव्हान आपल्या पुढे असल्याचे प्रकाश सरपाटील यांनी या वेळी सांगितले. आपल्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कोळी समाजातर्फे या वेळी सरपाटील यांची मिरवणूक काढण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 4:29 am

Web Title: prakash sarpatil selected on education board of murud municipalty
Next Stories
1 सतार व तबल्याच्या जुगलबंदीला नाशिककरांची दाद
2 जिल्हा रुग्णालयात मिळणार सायंकालीन बाह्य़रुग्ण सेवा
3 रायगड जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
Just Now!
X