25 January 2021

News Flash

धक्कादायक : दहावीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला

कॉपीहबहाद्दरांच्या व्हॉट्सअपवर देखील पोहचला

संग्रहीत छायाचित्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेस आज (३ मार्च) पासून सुरूवात झाली आहे. राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर हा धक्कादाय प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा पेपेर कॉपीहबहाद्दरांच्या व्हॉट्सअपवर देखील पोहचल्या असल्याचेही समोर आले आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कामाकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर, शिक्षण मंडळच्या सचिवांनी परीक्षेसंबंधी दिलेल्या आदेशांकडे  केंद्र प्रमुखांनी सर्रास दुर्लक्ष केल्याचे यातून दिसून आले आहे.

मागीलल वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल घटल्याने यंदापासून पुन्हा विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ११ वाजेपर्यंत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर वेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहाणेचेही सांगण्यात आले होते.

राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत परीक्षेसंबंधीची माहिती दिली होती. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले या वेळी उपस्थित होते. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जात आहे.

आणखी वाचा- डाएट डायरी : परीक्षा देण्यापूर्वी…

सर्व परीक्षा केंद्रांवरील तयारी कालपर्यंत पूर्ण झाली होती, शिवाय परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी एकूण २७३ भरारी पथकांसह बैठे पथकाची आणि विशेष महिला भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र लाखबंद पाकीट पर्यवेक्षक परीक्षा कक्षातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन उघडतील, असेही सांगितले गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 12:55 pm

Web Title: ssc marathi paper leak in jalgaon msr 87
Next Stories
1 देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का
2 ‘सामना’चे फक्त संपादक बदलले; रश्मी ठाकरेंकडं सूत्र गेल्यानंतर उद्धव यांचं ‘ठाकरे’ शैलीत उत्तर
3 धक्कादायक : सोलापुरात बाप लेकीच्या नात्याला काळीमा; मुलीवरच केला बलात्कार
Just Now!
X