आठ तलावांत निम्म्यापेक्षा कमी जलसाठा

यावर्षी केवळ ४२ टक्के पाऊस झाल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी नदीचा जलस्तर कमी झाला असून प्रकल्पातील आठ तलावांत निम्म्यापेक्षा कमी जलसाठा आहे. नैसर्गिक पाणवठय़ांसह नाले व कृत्रिम तलाव कोरडे पडल्याने बहुतांश पाणवठय़ांवर सौरऊर्जा पंपांची मदत घ्यावी लागत आहे. ही स्थिती बघता ताडोबातील वन्यप्राण्यांना डिसेंबर-जानेवारीपासूनच पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

हा प्रकल्प वाघ, बिबट, चितळ, हरीण, अस्वल, रानगवा, रानकुत्रे यासह विविध वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी प्रसिध्द आहे. या प्रकल्पात दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात. मात्र, यावर्षी या प्रकल्पाला तीव्र पाण्याची झळ सोसावी लागणार आहे. त्याला कारण यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस. या जिल्हय़ाची पावसाची सरासरी ११४२ मि.मी. आहे. मात्र, ८ सप्टेंबपर्यंत केवळ ४२ टक्केच पाऊस झालेला आहे. ताडोबा प्रकल्पालगतच्या इरई धरणात केवळ ३१ टक्के जलसाठा आहे. दरवर्षी पावसाळय़ात इरई धरण तुडुंब भरले की मोहुर्ली गावापर्यंत पाणी येते. यंदा पावसाअभावी धरणातील जलस्तर बराच खाली गेला आहे. केवळ इरई धरणच नाही तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची जीवनवाहिनी असलेल्या अंधारी नदीतील जलस्तर कमी झालेला आहे.

अंधारी नदीमुळे ताडोबाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या नदीवरूनच या प्रकल्पाचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असे नामकरण झाले आहे. या नदीच्या आजूबाजूला घनदाट अरण्य आहे. खातोडा गेटजवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. खातोडा नाल्यातून उगम पावलेली अंधारी पुढे मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना संजीवनी मिळाली आहे. ही नदी या प्रकल्पातील पानवठय़ांचे उगमस्थान आहे. या नदीच्या प्रवाहात वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम पानवठा आहे. मात्र, या नदीची धार आताच कमी झालेली आहे. त्याचा परिणाम नैसर्गिक पानवठय़ांमध्येही अत्यल्प पाणी आहे.

या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक नाले आहेत. यामध्ये उपाशानाला, जामून झोरा, तेलीया डॅम आहे.  बहुतांश नाले कोरडे ठणठणीत आहेत. साधारणत: नदी फेब्रुवारीपासून कोरडी होण्यास सुरुवात होते. उपाशा नाला कोरडा आहे. या प्रकल्पात १५ तलाव आहेत. यामध्ये ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलीया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्त्वाचे तलाव आहेत. अत्यल्प पावसामुळे ताडोबा तलाव पूर्णत: भरलेला नाही. त्यामुळे तलावात पाणी अर्ध्यापेक्षा थोडे जास्त आहे. इतर तलाव तर अर्धवट भरलेले आहेत. पंचधारा झऱ्याचा  प्रवाह खंडित झाला आहे. कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा आंबा, चिखलवाही, सांबर डोह, कासरबोडी, जांबून झोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा या पानवठय़ातही कमी पाणी आहे. ही स्थिती लक्षात घेतली तर यावर्षी ताडोबातील वन्यप्राण्यांना डिसेंबर व जानेवारीपासूनच जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. पाण्यासाठी वन्यप्राणी जंगलालगतच्या गावांच्या दिशेने भटकू शकतात आणि त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो, अशी भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

‘उन्हाळय़ात पाणी टंचाई जाणवेल’

इरई नदी, धरण व तलावांसोबतच नैसर्गिक पाणवठे आणि कृत्रिम पाणवठय़ांत पाणी कमी आहे. त्यामुळे उन्हाळय़ात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्रपणे जाणवेल, असे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. सौरऊर्जा पंपांसोबतच टँकर्सची तयार आहेत. ताडोबा बफर झोनमध्ये एकूण १०३ तलाव आहेत. यातील निम्मे तलाव अध्रे भरले आहेत. जलयुक्त शिवारमधून तयार करण्यात आलेल्या तलावांचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे उन्हाळय़ात पाणी टंचाई जाणवेल, असे बफर झोनचे उपवनसंरक्षक नरवणे यांनी सांगितले.