औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला. एसीबीने टाकलेल्या छाप्यात एक कोटींचे फिक्स डिपॉझिट, ८० तोळे सोने, दीड किलो चांदी व महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आल्याचे कळते.
महाराष्ट्र सदन बांधकाम विभागातील घोटाळ्याप्रकरणी एसीबीने देशपांडेंच्या चेलीपूरा भागातील घरावर हा छापा टाकला. दीपक देशपांडे हे तत्कालीन बांधकाम सचिव होते. सध्या औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. दरम्यान, बांधकाम विभगातील घोटाळया प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्हात छगन भुजबळ यांच्यासह दीपक देशपांडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.