भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधील विजयानंतर एक लाख सांड्याचे वाटप करणार आहेत. पुणे मिररच्या वृत्तानुसार, चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटपाची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांवर सोपवली आहे. कोथरूडमध्ये २४ पैकी भाजपाचे १८ नगरसेवक आहेत. भाऊबीजेच्या दिवशी एक लाख साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

पण महिलांना भाऊबीज म्हणून साड्या वाटण्याचा पाटील यांचा उपक्रमाला स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. नगरसेवकांच्या मार्फत काही वस्ती भागातील महिलांना साड्या देण्याचा पाटील यांचा उद्देश आहे. मात्र. काही नगरसेवकांनी दबक्या आवाजात याला विरोध दर्शवला आहे. येथील दोन-तीन हजार महिलांना साड्या दिल्या तर उर्वरीत महिलांना साड्या कोण देणार? त्यांचा रोष कोण पत्करणार? असा सवाल स्थानिक नगरसेवकांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील उमेदवारीला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. या संदर्भात मोठं राजकीय नाट्यही घडले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. विजयानंतर पाटील यांनी महिला मतदारांना साड्या वाटण्याचा निर्णय घेतला आहे. याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.