scorecardresearch

सात अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार; शिक्षकाला अटक

अल्पवयीन विद्यार्थिनींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून वर्षभरापासून अत्याचार केल्याची शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना जिवती तालुक्यात समोर आली आहे.

Women protection shakti law maharashtra in marathi

रवींद्र जुनारकर

चंद्रपूर: अल्पवयीन विद्यार्थिनींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून वर्षभरापासून अत्याचार केल्याची शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना जिवती तालुक्यात समोर आली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षक अच्छुत खोबाजी राठोड (४९) याला जिवती पोलिसांनी अटक केली आहे.

जिवती तालुक्यातील एका गावात पहिली ते पाचवीपर्यंतच्या जि.प.शाळेत आरोपी नराधम शिक्षक अल्पवयीन मुलींना कार्यालयात आळीपाळीने बोलवायचा. त्यानंतर अश्लिल चाळे करुन अत्याचार करायचा. हा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरु असून एका मुलीने आईला ही घटना सांगितल्यानंतर आरोपी शिक्षकाचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी शिक्षकाने सात विद्यार्थिनींसोबत असा घृणास्पद प्रकार केला असून, मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करीत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Atrocities seven underage students teacher arrested crime police parents ysh

ताज्या बातम्या