शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. त्यांना आज कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंतचा वेळ मागून घेतला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी, ‘माझ्याशी पंगा घेऊ नका. मी नंगा माणूस आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. याच प्रतिक्रियेवरून माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

अर्णब गोस्वामी यांची त्यांच्याच शो मध्ये ‘बोलती बंद’; चर्चेसाठी आलेल्या प्रवक्त्याने सुनावलं…

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या.” याचसोबत, “शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे”, असंही ट्विट करत त्यांनी शिवसेनेलाही कोपरखळी मारली.

Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य

“हाच शिवसेनेचा खरा चेहरा”; भाजपाचे भातखळकर यांची टीका

दरम्यान, वर्षा राऊत यांना पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. “हो, आम्ही वेळ वाढवून मागितली आहे. इतकं मोठं प्रकरण आहे. संपूर्ण देश हादरला आहे. आपल्या देशात सध्या काहीच सुरु नाही. सध्या ही ५० लाखांची एकच केस त्यांच्याकडे आहे. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल”, असंही ते म्हणाले.