अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात बीड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक टेकवाणी कुटुंबातील तीन भाऊ व एक तरूण असे चौघे जागीच ठार झाले.तर एक वीस वर्षीय मुलगा मात्र बालंबाल बचावला असुन त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक शंकर शेठ टेकवाणी काही कामानिमित्त दोन भाऊ व दोन पुतणे असे पाच जण क्रेटा कारने बुधवारी (११ एप्रिल २०२२) सायंकाळी सातच्या सुमारास घरून नगरला जाण्यासाठी निघाले. भरधाव वेगातील गाडी रात्री दहाच्या सुमारास नगर रस्त्यावरील धामणगाव गावाजवळ असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यामध्ये जाऊन आपटली.

या अपघातात गाडीमध्ये शंकर शेठ टेकवाणी (वय ५५), त्यांचे बंधू सुनील टेकवाणी (वय ५०), शंकर टेकवाणी (वय ४८ ), तर पुतण्या लखन महेश टेकवणी (वय ३०) सर्व राहणार कारंजा (बीड) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. गाडीमधील मृत शंकर टेकवणी यांचा मुलगा निरज (वय २० वर्षे) हा मात्र या भीषण अपघातात थोडक्यात बचावला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गाडी कोण चालवतो होते याची माहिती उपलब्ध झालेली नाही. मोठा आवाज झाल्याने जवळच्या लोकांनी घटनास्थळाकडे जाऊन गाडीतून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि जखमींना रुग्णालयात पाठवले. अपघातात गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याने अपघाताची भीषणता लक्षात येते. घटनेची माहिती मिळताच शहरातून नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली. सकाळी त्यांचे मृतदेह घरी आणण्यात आले असल्याने नातेवाईकांनी सांगितले.

हेही वाचा : चालकाची झोप लागली अन् घात झाला; यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघातात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू

बीड शहरात टेकवाणी कुटुंबाची दिव्य गार्डन, जनरल स्टोअर्स यासह अनेक व्यावसायिक दुकाने आहेत. टेकवाणी बंधुंचा सामाजिक कामातील सहभागही चांगला असायचा. त्यामुळे त्यांचा संपर्क मोठा होता. एकाच वेळी कुटुंबातील करत्या तीन पुरुषांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car accident on beed ahmednagar road four people from businessman family died pbs
Show comments