१, २ फेब्रुवारी रोजी आयोजन; यंदा ‘चिकू महोत्सव दौड’चे आयोजन

पालघर : चिकू फळाचे उत्पादन आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थाना चालना देण्यासाठी बोर्डी येथे चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बोर्डीच्या किनारी १ आणि २ फेब्रुवारी रोजी हा महोत्सव रंगणार असून विविध कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात आहे. विशेष म्हणजे यंदा खास चिकू महोत्सव दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

Ban on use of drones due to Prime Minister visit to Pune print news
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

रुरल इंटॉरप्रीर्नशिप वेल्फेअर फाऊंडेशन या पर्यटनाला चालना देणाऱ्या संस्थेने एमटीडीसीच्या मदतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा महोत्सवाचे आठवे वर्ष आहे.

चिकू फळ आणि त्यापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थाना नागरिकांमध्ये रुची निर्माण व्हावी तसेच बोर्डी परिसरातील पर्यटन विकसित व्हावे, स्वयंरोजगार व गृहउद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या चिकू महोत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून गेल्या वर्षी सुमारे दीड लाखांहून अधिक जणांना या महोत्सवाला भेट दिल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. बोर्डी कॅम्पिंग ग्राऊंड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुनीता बाफना या ‘चिकू की कहानी’ या सत्रामध्ये चिकूू  फळाच्या वाटचालीबाबत सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबरीने ‘चिकूच्या कट्टय़ावरून’ या सत्रामध्ये स्थानिक उद्योजकांच्या वाटचालीबाबत माहिती देण्यात येणार आहे. वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीची माहिती व खाद्यपदार्थाच्या पाककृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून पारंपरिक आणि भारतीय संगीतावर आधारित करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात येणार आहे.  या महोत्सवातून स्थानिक शेतकरी व महिला उद्योजकांना लाभ व्हावा तसेच चिकू फळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.

विविध कार्यक्रमांची रेलचेल

*  चिकू महोत्सवात यंदा निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यावर ‘चिकू महोत्सव दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.

*  स्थानिक कलाकारांकडून त्यांच्या पारंपरिक कलाकृतींचे कार्यशाळा आयोजन करण्यात येणार आहे.

*  यंदाही ‘चिकू सफारी’ व ‘वायनरी टूर’ या कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या उपक्रमाचे व आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

*  स्थानिक उत्पादने, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी सुमारे दोनशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.