त्र्यंबकेश्वरमध्ये आज (६ फेब्रुवारी) निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये आले आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे वारकऱ्यांची व्यवस्था पाहण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. भुसे म्हणाले, वारकऱ्यांची व्यवस्था नीट करण्यात आली आहे का याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेण्यास सांगितलं होतं. येथे नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बचत गटाचे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमात ८० स्टॉल लागले आहेत. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू येथे विकता येतील. त्याचबरोबर ७० ते ८० गावातील ग्रामपंचायतींसाठी आज वैंकुटरथाचे वाटप करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेलाही दादा भुसे यांनी उत्तर दिलं. संजय राऊत यांनी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. तसेच काही गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात कथित रील्स शूट केले आहेत. हे रील्स सध्या व्हायरल होत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी या रील्सवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना दादा भुसे म्हणाले, आम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं समर्थन करत नाही.

दादा भुसे म्हणाले, गर्दीत कोणी आला असेल, मुख्यमंत्री सतत गर्दीत असतात. याआधी वर्षा बंगल्यावर विशिष्ट लोकांना सोडण्यात येत होतं. आता सर्वसामान्य नागरिकही वर्षावर जात आहेत. इतक्या किरकोळ गोष्टीचा बाऊ करणं योग्य नाही. जे आरोप करत आहेत त्यांचेही फोटो आम्ही दाखवू शकतो. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं आम्ही समर्थन करत नाही. त्यांच्यावर कारवाई होईल.

हे ही वाचा >> संसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर? ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”

तसेच संजय राऊतांकडे हल्ली कोणी गांभीर्याने पाहत नाही. राऊत सातत्याने गणपत गायकवाडांचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे राऊत स्वतः गणपत गायकवाड यांच्याकडे हिशेब घेण्यासाठी गेले होते का? असा प्रश्न पडला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dada bhuse on nilesh ghaiwal photo with cm eknath shinde gangsters reel in vidhan bhavan rno news asc