ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्बल १०३ दिवसांनंतर तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. बुधवारी ही सुटका झाल्यानंतर संजय राऊतांनी शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली. “मला अटक करणं ही देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी चूक”, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपालाही लक्ष्य केलं. यानंतर आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. “फडणवीसांनी केल्या तीन महिन्यांत काही चांगले निर्णय़ घेतले. महाराष्ट्रात निर्माण झालेली कटुता संपवण्यासंदर्भात त्यांनी केलेल्या आवाहनाचं मी स्वागत करतो”, असंही संजय राऊत म्हणाले. यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांच्या जामिनावर प्रतिक्रिया…

देवेंद्र फडणवीसांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांच्या जामिनावर भूमिका मांडली. “कोर्टानं एक निर्णय दिला आहे. तो निर्णय योग्य की अयोग्य यावर ईडी बोलू शकेल. ते उच्च न्यायालयात गेले आहेत. आत्ता त्यावर काही बोलणं योग्य होणार नाही. उच्च न्यायालयातल्या सुनावणीनंतर आपण त्यावर बोलू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

कटुता कशी दूर होणार?

दरम्यान, संजय राऊतांनी कटुतेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. तसेच, अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. “मला जर राऊतांनी भेट मागितली तर मी देईन. मी सगळ्यांनाच भेट देतो. पण राजकारणातली कटुता दूर करायची असेल, तर सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. कुठलाही एक पक्ष हे करू शकत नाही. नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं ही पद्धतही बंद करावी लागेल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“भाजपाकडून अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न”, कबरीवरून काँग्रेस प्रवक्त्याची टीका; म्हणाले, “अनधिकृत बांधकामं…”

अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण

दरम्यान, आज प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज शिवप्रताप दिन आहे आज. या अतिक्रमणासंदर्भात २००७ साली न्यायालयानं निर्णय दिला होता. २०१७साली आम्ही कारवाई सुरू केली होती. पण नंतर त्यात पुन्हा कायदेशीर अडचणी आल्या. आता त्या सगळ्या अडचणी दूर करून हे अतिक्रमण काढलं जात आहे.ही सगळ्यांसाठी समाधानाची बाब आहे”, असं ते म्हणाले.