गर्भलिंग चाचणी करून जबरदस्तीने गर्भपात केल्याची तक्रार एका विवाहितेने दिली असून, या प्रकरणी संबंधित महिला डॉक्टरसह सासरच्या ११ जणांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित महिला डॉक्टरने घरावर असलेला रुग्णालयाचा फलकही गायब केला आहे. या प्रकरणी पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद असल्याचे रविवारी दिसून आले.

जयसिंगपूरच्या एका तरुणीचे मिरजेतील कय्यूम नदाफ या तरुणाशी चार वर्षांपूर्वी लग्न झाले. दाम्पत्याला एक मुलगी झाल्यानंतर दुसऱ्यांदा गरोदर असताना डॉ. चित्रा दिवाण यांच्याकडे गर्भिलग चाचणी केली. यानंतर मुलगी असल्याचे लक्षात येताच सासरच्या मंडळींनी जबरदस्तीने गर्भपात केला असल्याची तक्रार संबंधित तरुणीने मिरज शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Krushna Abhishek reacts on Mama Govinda
वादानंतर अनेक वर्षांपासून अबोला, तरीही मामा गोविंदाने भाचीच्या लग्नाला लावली हजेरी; कृष्णा अभिषेक म्हणाला…
plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा

या प्रकरणी पती कय्यूम नदाफ याच्यासह सासू चांदबी, सासरा उस्मान, दीर काबीर, नणंद कौसर, जमीना, रुकय्या, पतीचा मित्र रफीक पटेल, जहूर पटेल व डॉ. दिवाण या ११ जणांविरुद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना विचारले असता, या तक्रारीची सत्यता पडताळून पाहून कारवाई करण्यात येईल अशी भूमिका मांडली. मात्र पीडित महिलेने या बाबत माध्यमांशी बोलताना या प्रकरणात सहभागी असलेल्या पतीच्या मित्राने रात्री पोलीस अधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा करून गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या डॉक्टर महिलेकडून या प्रकाराबाबत अद्याप चौकशी सुरू असून, पुरावे जमा करून कारवाई करण्यात येईल असेही पोलीसांनी सांगितले. संबंधित डॉक्टरने किल्ला भागात असलेल्या रुग्णालयाचा फलकही रात्रीत गायब केला असल्याचे रविवारी दिसून आले.