परभणी – आंतरजातीय प्रियकराशी विवाह करणाऱ्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील नाव्हा येथे २१ ते २२ एप्रिल दरम्यान घडली. तब्बल दहा ते बारा दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मृत मुलीचे वडील बालासाहेब भीमराव बाबर, आई रुखमीनबाई बालासाहेब बाबर, अच्यूत दत्तराव बाबर, राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रूस्तूमराव बाबर, आबासाहेब रूस्तूमराव बाबर, गंगाधर योगाजी बाबर, गोपाळ अशोक बाबर यांच्याविरूद्ध शुक्रवारी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>> सोलापुरात कचरा आगारापाठोपाठ स्मार्ट सिटीच्या पाईप साठ्यालाही मोठी आग

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl strangled to death in honour killing in parbhani zws
First published on: 04-05-2024 at 23:44 IST