बुलढाणा  : Jalna Lathi Charge in Maratha Reservation Protest ज्यांनी मराठा आरक्षणाचा गळा घोटला, तेच शनिवारी जालन्यात गळे काढताना दिसले. दीर्घकाळ सत्तेत असणारे असो की मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण असोत की अडीच वर्षे मुख्यमंत्री राहणारे उद्धव ठाकरे असोत सर्वानी जालन्यात ऊर बडवून घेतले. मात्र त्यांचे अश्रू हे मगराश्रू होते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली.

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज मलकापूर मार्गावरील कऱ्हाडे लेआऊटमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री वगळता मंत्री, खासदार, आमदार बहुसंख्येने हजर होते. ‘‘राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहे. ४० वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणावर एक शब्दही काढला नाही. आज ऊर बडवणाऱ्यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आरक्षणविषयक प्रशासकीय व अनुषंगिक घोळ घातला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात उच्च न्यायालयापर्यंत टिकलेले आरक्षण रद्द झाले. सर्वोच्च न्यायालयात यासाठी अभ्यासू सॉलिसिटर, विधिज्ञ नेमण्यात आले नाही,’’ असा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

satara cm Eknath shinde, Eknath shinde land purchase,
सातारा: मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष, कोयना खोऱ्यातील जमीन खरेदीबाबत मत व्यक्त करण्याची पर्यावरण कार्यकर्त्यांची अपेक्षा
Anil Parab On Ashish Shelar Eknath Shinde Uddhav Thackeray
“आशिष शेलार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये वाद”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा
What Eknath Shinde Said About PM Narendra Modi?
“मोदींना जितक्या शिव्या द्याल..”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला, विधानसभेच्या जागावाटपाबाबत म्हणाले..
dcm ajit pawar not reachable since after baramati constituency polling
अजित पवार कुठे आहेत?
Eknath shinde, shrirang barne
“१३ तारखेला विरोधकांचे बारा वाजणार”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “दाढीवाल्यांच्या नादी…”
Ganesh Naik, Shinde group,
गणेश नाईकांची नाराजी दूर, पण शिंदे गटाबरोबरील मनभेद मिटतील ? नवी मुंबईतील राजकारणात विसंवादाची चर्चा
Shivsena Thackeray group,
उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न

हेही वाचा >>> Jalna Lathi Charge : न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत; पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून विरोधक माझा पराकोटीचा द्वेष, मत्सर करतात. मात्र, एक वर्ष उलटूनही माझे पद कायम आहे. याउलट आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने पद अन सरकार अधिकच बळकट झाल्याचा टोला त्यांनी लगावला. मंत्री गिरीश महाजन यांनी, चाळीस वर्षांत मराठा आरक्षणावर एक शब्द न बोलणाऱ्या शरद पवार यांची जालना भेटीत ‘ऐतिहासिक नाचक्की’ झाल्याचे यावेळी वक्तव्य केले.

हेही वाचा >>> Jalna Lathi Charge: पंढरपुरात बंदला प्रतिसाद, भाविकांचे हाल; जालन्यातील लाठीमाराचे दुसऱ्या दिवशीही पडसाद

दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित

मुख्यमंत्र्यांच्या रविवारच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही उपस्थित नव्हते. यामुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नसल्याचे कृपया राजकारण करू नका, असे विरोधक व प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हटले.

संतप्त शेतकऱ्याचा आक्रोश

मुख्यमंत्र्यांनी भाषणात शेतकरी व दुष्काळग्रस्त परिस्थिती यावर काहीच भाष्य केले नाही. यामुळे एका शेतकऱ्याने जागेवरून उठून ‘दुष्काळाबद्दल सांगा’ असे ओरडून सांगितले. तेथे तैनात पोलिसांनी तत्काळ त्याच्याभोवती कडे घालत सभास्थळाबाहेर नेले.