कराड : राज्यावर संकट येते तेव्हा हा एकनाथ शिंदे सदैव पुढे असतो. शब्द देतो तो पूर्ण करतोच. आरोपाला आरोपाने नव्हेतर कामातून उत्तर देत असतो, उंटावरून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नसून, थेट जनतेमध्ये जावून त्यांच्याशी संवाद साधणारा, त्यांचे प्रश्न सोडवणारा सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्द्‌व ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

मोरगिरी (ता. पाटण) येथे दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पाटण व मल्हारपेठ पोलीस ठाणे निवासस्थान व मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण पार पडले. पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
Deputy Chief Minister Devendra Fadnavis challenges Uddhav Thackeray to show the good work he has done for Mumbai
मुंबईसाठी केलेले चांगले काम दाखवा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!

हेही वाचा >>> पंकजा मुंडे लोकसभा लढविणार? सूचक विधान करताना म्हणाल्या, “आता लोकसभेची काळजी…”

संकटग्रस्तांना वाचवणारे आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचा विश्वास देवून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून आठ गावांतील लोकांचे संसार उद्‌वस्त झाल्याचे मी घटनास्थळी येवून पाहिले. यात काहीजण मृत्यूमुखीही पडले ही दुर्दैवी घटना पाहून मन हेलावून गेले. यातून लोकांना सावरणे हे पहिले कर्तव्य असल्याने त्यावेळी दरडग्रस्तांच्या निवाऱ्यासाठी तात्काळ पाच कोटींची तरतूद करून निवारा शेड उभारले. दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पालकमंत्री शंभूराजेंनी पाठपुरावा केला. मी विकास प्राधिकरणाच्या कायद्यातील त्रुटी बाजूला ठेवून तात्काळ या पुर्नवसनासाठी १६० कोटी रुपये मंजूर केले. यामुळे आज या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकाभिमुक अनेक प्रकल्पांचा आज प्रारंभ झाला. त्यातील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून कोयना धरणाच्या जलसाठा १० टीएमसीने वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पालकमंत्री शंभूराजेंनी दीड वर्षात अनेक लोकभिमुक उपक्रम राबवल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शंभूराजेंच्या एकूणच कामाचे कौतुक केले. मुनावळे पाठोपाठ पाटण तालुक्यातही जलक्रीडा प्रकल्प आणत असून, त्यासाठी ७०  कोटींची तरतूद केली आहे.

हेही वाचा >>> सहा फूट लांबी, तीन किलो वजनाच्या जटामुक्तीने अनोखा महिला दिन साजरा

राज्यात अल्पावधितच अनेक विकासाचे प्रकल्प, लोकहिताच्या योजना आणल्या. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यास सुरुवात करून, आजवर आम्ही पाचशे जनहिताचे निर्णय घेतले. त्यात केंद्र सरकारचेही सहकार्य मिळत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शंभूराजे म्हणाले, दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी निवाऱ्याचा महत्वपूर्ण निर्णय अर्ध्या तासाच्याच बैठकीत झाला. याची केवळ कागदावर कार्यवाही न होता प्रत्यक्ष कामाला आजपासून सुरुवात झाली. वर्षभरात आठही गावांच्या अद्ययावत इमारतींचे काम पूर्ण होईल.

फक्त छायाचित्रण करत फिरावं का? मी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा. तुमच्यातीलच एक. तुम्हीच माझा परिवार. पण, सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो हे काहींना  आवडत नाही. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होवू नये? शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरने जावून शेती करू नये? की फक्त हेलिकॉप्टरमधून छायाचित्रण करत फिरावं असा काय नियम आहे का? सोन्याचा चमचा घेवून ज्यांचा जन्म झाला त्यांनाच फक्त मुख्यमंत्री बनणण्याचा अधिकार आहे का? अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.