आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागतील. दरम्यान या निवडणुका लक्षात घेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे. अजित पवार यांचे समर्थक नेते तसेच आमदार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील त्यांच्या बारामती मतदारसंघाकडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, आज (१६ फेब्रुवारी) बारामतीत बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षफूट आणि पवार कुटुंबीयांची राजकीय भूमिका यावर मोठं विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा”

अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक विकासकामांची पाहणी केली. तसेच त्यांच्या गटातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी संबोधित केले. आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहावे, जोमाने प्रचार करावा असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले.

“मला एकटं पाडण्यासाठी…”

“आमच्या घरातील शरद पवार हे एकमेव वरिष्ठ आहेत. बाकीचेही आहेत पण ते पुण्यात असतात. माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. माझ्या घरातले बाकीचे सगळे माझ्या विरोधात गेले तरी ही जनता माझ्यासोबत आहे. प्रत्येकाला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवचं रान करतात ते बघा,” असा टोला अजित पवार यांनी लगावला.

हेही वाचा >> अजित पवारांचे बारामतीकरांना पुन्हा भावनिक आवाहन; म्हणाले, “सख्ख्या भावाच्या घरी जन्मलो..”

“काहीजण तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, पण…”

या निवडणुकीत तुम्हाला भावनिक आवाहन केले जाईल. तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही विचलित होऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. “मला तुमची साथ आहे. तुमचा पाठिंबा आहे. तुम्ही जोपर्यंत एकजूट आहात तोपर्यंत माझं काम अशाच तडफेने चालत राहील. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. काहीजण तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक झाल्याने कामं होत नाहीत. काम हे तडफेनेच करावे लागते. पूर्ण जोर लावूनच काम करावे लागते,” असेही अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader ajit pawar comment on upcoming assembly and general election 2024 criticizes sharad pawar prd
First published on: 16-02-2024 at 16:02 IST