निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे समर्थकांना धक्का बसला आहे. तर आम्ही पुढील रणनीती लवकरच ठरवू असे शिंदे गटाने सांगितले आहे. असे असताना माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा शिवसेना हे नाव वापरू न देण्याचा निर्णय अनाकलनीय आहे, असे वळसे पाटील म्हणाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक पुढे ढकलायला हरकत नाही, असे वळसे पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? चंद्रकांत खैरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

What Gopal Shetty Said?
Gopal Shetty : भाजपात बंडखोरी! गोपाळ शेट्टींकडून अपक्ष अर्ज दाखल, म्हणाले; “बोरीवली काय धर्मशाळा…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Shrinivas Pawar Ajit Pawar
Shrinivas Pawar : अजित पवारांची आई कोणाच्या बाजूने? उपमुख्यमंत्र्यांनी भर सभेत कौटुंबिक गोष्टी सांगितल्या; थोरला भाऊ म्हणाला…
Ajit Pawar
Ajit Pawar : “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”
Bigg Boss Marathi season 5 winner suraj Chavan speech at Ajit Pawar Baramati Sabha
Video: तोंड लपवत सूरज चव्हाणची अजित पवारांच्या बारामती सभेत एन्ट्री, एका मिनिटांचं केलं भाषण; म्हणाला, “दादांना झापूक झुपूक…”
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”
Lakhan Malik
Lakhan Malik : भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे आमदार लखन मलिक ढसाढसा रडले; म्हणाले, “इमानदारीने काम केलं, पण…”

अजिबात न समजणारा हा निर्णय आहे. आमदार निलंबनाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह काही काळासाठी गोठवणे समजू शकतो. पण पक्षाचे नावच वापरता येणार नाही, हे न समजण्यासारखे आहे. आज या पक्षाचे विधानसभेत, लोकसभेत अनेक आमदार आणि खासदार आहेत. मग या लोकप्रतिनिधींनी काय करायचे? निवडणूक आयोगाला एवढीच अडचण वाटत असेल तर पोटनिवडणूक पुढे ढकलण्यास काय करकत आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा>>> “निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय..,”धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला?

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांना आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाचाही वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला दोन वेगवेगळी चिन्हे दिली जातील.