राज्यात दहा महानगरपालिकांसाठी मतदान सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन होताना दिसते आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेविषयक पार्श्वभूमीची माहिती देणारा फलक लावण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या होत्या. मात्र नागपूरसह अनेक भागांमध्ये मतदान केंद्रांवर फलक लावण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे ज्या भागात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणुकीला उभे आहेत, त्याच भागातील मतदान केंद्रांवर फलक लावले न गेलेले नाहीत.

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मतदान केंद्रावर फलकांच्या माध्यमातून लावण्यात यावी. त्यामुळे मतदाराला लोकप्रतिनिधी निवडताना मदत होईल, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. नागपूरमध्ये मात्र या सूचनेला फाटा देण्यात आला आहे. शिवसेना उमेदवार आणि कुख्यात गुंड अनिल धावडे निवडणूक लढवत असलेल्या भागातील ७ मतदान केंद्रांवर कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. अनिल धावडे शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २२ ड मधून निवडणूक लढवत आहे. धावडेवर २२ गुन्हे दाखल आहेत. मात्र अनिल धावडे राहात असलेल्या भागातील सात मतदान केंद्रांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणारे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत.

Traffic jam, Kalyan Dombivli,
कल्याण, डोंबिवलीत उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी, प्रवासी हैराण
International Country Relations in Electoral Politics
लेख: निवडणुकीच्या राजकारणात आंतरराष्ट्रीय संबंध!
water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?

प्रभाग क्रमांक २२ ड मधून अनिल धावडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या प्रभागात एकूण ८३ मतदान केंद्र आहेत. यातील १८ मतदान केंद्र धावडे राहात असलेल्या भागात आहेत. या १८ मतदान केंद्रांपैकी ७ मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. याबद्दल मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी फलक न मिळाल्याची माहिती दिली. या संपूर्ण प्रकाराबद्दल अनिल धावडेच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.