लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : रत्नागिरी नागपूर महामार्गावर भरधाव वाहनांने धडक दिल्याने दुचाकीवरील एक तरूण ठार तर तिघेजण जखमी झाले. रविवारी पहाटे मिरजेजवळील कळंबी या गावच्या हद्दीत झाला.

भोसे (ता. मिरज) येथून चार तरूण दोन स्वतंत्र दुचाकीवरून सरावासाठी जिल्हा क्रीडा संकुलाकडे येत होते. पोलीस भरतीसाठी त्यांचा सराव सुरू होता. कळंबीजवळ आल्यानंतर मागून आलेल्या भरधाव वाहनाने कळंबी गावाजवळ या दोन्ही दुचाकीना धडक दिली. यामध्ये शिरीष आमसिध्द खंबाळे (वय २१ रा. भोसे) हा तरूण जागीच ठार झाला तर विश्‍वजित मोहिते (वय २४), प्रथमेश हराळे (वय २४) आणि प्रज्वल साळुंखे (वय २४) हे तिघे जखमी झाले. जखमीपैकी साळुंखे याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून अन्य दोघांवर मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

आणखी वाचा-अजित पवारांचा जरांगे पाटलांना इशारा, मराठा आक्षणावर बोलताना म्हणाले; “आपण काय बोलतोय…”

औदुंबरमध्ये दोन महिला ठार

दरम्यान, शनिवारी औदुंबर येथे दत्तदर्शनासाठी आलेल्या मोटारीसमोर अचानक महिला आडवी आल्याने झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्या, तर दोघे जखमी झाले.

पुण्याहून उल्लाळकर कुटुंब औदुंबरच्या दत्त दर्शनाला मोटारीने येत होते. आष्ट्याजवळ आल्यानंतर अचानक रूपाली सचिन कांबळे ही महिला मोटारीच्या आडवी आली. तिला ठोकरल्यानंतर मोटार (एमएच २ डब्ल्यूई ६७७५) रस्त्याकडेच्या उसाच्या रानात आदळली. या अपघातात मोटारीतील आश्‍विनी पंकज निकम (वय ३७) ही महिला आणि मोटारीच्या आडवी आलेली महिला कांबळे या दोघी जागीच ठार झाल्या. तर या अपघातात चालक अक्षय उाळकर आणि मृत महिलेचा मुलगा देवांश निकम हे जखमी झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One man dead 2 injured after hitting a bike on highway mrj