पुणे गुन्हे शाखेने १ कोटी ११ लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही सर्व रक्कम पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांमध्ये आहे. जागेची दलाली करणाऱ्या एका व्यक्तीकडून पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली. शिवाजीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. पुणे गुन्हे शाखेने ही रक्कम आयकर विभागाला सुपूर्द केली आहे.

अंकेश अगरवाल नावाच्या व्यक्तीकडून पोलिसांनी १ कोटी ११ लाखांची रक्कम ताब्यात घेतली आहे. जागेच्या दलालीचा व्यवसाय करणाऱ्या अंकेशला त्याच्याकडे असणारी रोख रक्कम अनधिकृत मार्गाने बदलून घ्यायची होती. यासाठी अंकेश अगरवाल एजंटच्या शोधात होता. मात्र त्याआधीच अंकेशला पोलिसांनी रोख रकमेसह ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक कदम त्यांच्या टिमसह या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.