पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर वाहने गेल्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. यानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने पुणे जिल्हा माहिती कार्यालयाकडे खुलासा पाठवण्यात आला आहे. “आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी वाहने क्रीडा संकुलातील ट्रॅकवर पाहणीसाठी आली होती. अथलेटिक्स ट्रॅक शेजारी असलेल्या सिमेंट क्रॉक्रिंटवरून प्रमुख मान्यवरांची एकच गाडी जाण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र काही गाड्या अचानक ट्रॅकवर गेल्याने दिलगिरी व्यक्त करत आहोत.” असा खुलासा करणारं पत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे. तसेच यापुढे अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर वाहनं जाणार नाही याबाबत योग्य दखल घेतली जाईल असंही या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार, इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी आलेल्या नेत्यांच्या गाड्या थेट क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या मुख्य स्टेडियममध्ये अ‍ॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅकवरून चालवल्या गेल्या. या घटनेचे फोटो शेअर करत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शरद पवार यांच्यासह ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली होती.

Indegene IPO is open for investment from May 6 eco news
इंडेजीनचा ‘आयपीओ’ ६ मेपासून गुंतवणुकीस खुला
Mumbai, parks, misused, mnc,
मुंबई : १२ उद्यानांचा गैरवापर होत असताना पालिकेची डोळेझाक
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन

“कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई नको”, परिसरातील व्यवसायिकांची मागणी

घटनेची चर्चा

म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य स्टेडियममध्ये अ‍ॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आलेला आहे. स्टेडियमच्या कडेला असलेल्या दोन मजली इमारतीमध्ये स्पर्धेच्या काळात वापरण्यासाठीची दालने आहेत. पण त्यांचा क्रीडा संचालनालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ताबा घेत तेथे आलिशान कार्यालये थाटली आहेत. मुख्य इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहेत. तर स्टेडियमची रचना अशी आहे, की अ‍ॅथलेटिक्सची धावपट्टी दुसऱ्या मजल्याला समांतर आहे. मंत्र्यांना लिफ्टने जाण्याचा त्रास नको म्हणून या धावपट्टीवर गाड्या आणून, त्यांना विनासायास बैठक कक्षात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असं बोललं जात आहे. इतकंच नाही, तर सर्व मान्यवर बैठकीसाठी आल्यानंतर ही वाहने बैठक संपेपर्यंत तेथेच उभी होती.