केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का? असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही, अशा शब्दांत रामदास आठवलेंनी सुनावलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला जोडण्याचं काम केलं आहे. हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित वाद होत असले, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं की, जात-धर्म-भाषेपेक्षा देश महत्वाचा आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वांनी लढलं पाहिजे.”

Loksabha Election 2024 Kerala Congress Left fight in Kerala BJP
“तुमच्या आजीनेच आम्हाला तुरुंगात टाकलं”; डाव्यांची राहुल गांधींवर टीका
HM Shri Amit Shah Public Meeting in Akola
“संविधान बदलणार नाही,” अमित शाह यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण”
Rahul Gandhi criticism of BJP as a repeat of the defeat of Shining India this year
‘शायनिंग इंडिया’ची यंदा पुनरावृत्ती, भाजपवर राहुल गांधी यांची टीका; भाजप आघाडीला १८० जागा मिळण्याचे भाकीत
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…

हेही वाचा : “शिवसेना ही आग आहे, तुम्ही कितीही…”, शिंदे गटाने अर्ज मागे घेतल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकरांनी भारत जोडण्याचं काम केलं. कायद्यानं जातीव्यवस्था संपवण्यात आली आहे. त्यामुळे भारत जोडलेलाच आहे. पण, जोडला नसेल, तर काँग्रेसने का जोडला नाही? सगळ्या राज्यांत काँग्रेसची सत्ता असताना काय केलं? ही भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा होती,” असं टीकास्र रामदास आठवलेंनी सोडलं.

“राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही. राहुल गांधींच्या यात्रेचा फारसा परिणाण होईल, असं वाटत नाही,” असं रामदास आठवलेंनी म्हटलं.

हेही वाचा :

“इंडिया हे आपल्या देशाचं नाव आहे. देशाच्या नावावर निवडणूक लढणं ठिक नाही. आम्ही याचा विरोध केला, तर इंडियाला विरोध करतायत असं म्हणतील,” असेही रामदास आठवले म्हणाले.