|| प्रशांत देशमुख
आधी करोना, आता श्रावणमासामुळे कोंबडी बाजारावर मरगळ
वर्धा : करोना संक्रमणाच्या फटक्यातून सावरण्यासाठी धडपडत असलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता श्रावणाच्या तडाख्यात सापडला आहे. व्यवसाय पन्नास टक्क्यांनी घटल्याने  विदर्भातील कोंबड्यांची तेलंगणात विक्री केली जात आहे.

दीड वर्षातील करोना संक्रमणात कुक्कुटपालन व्यवसाय चांगलाच कोलमडला. बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याने कोंबड्याच्या पोषणाचा  श्रावणात मांस वज्र्य असलेल्यांची संख्या मोठी आहे. हा एक महिना बहुतांश  घरी मांस शिजत नाही. परिणामी, विदर्भात पन्नास टक्के विक्री कमी झाली आहे. विदर्भात वीस हजारांवर कुक्कुटपालन केंद्र आहेत. यापैकी पन्नास टक्के केंद्र  बाजारपेठेअभावी बंद पडले. करोनापाठोपाठ श्रावणमास आला. कुक्कुटपालनात प्रामुख्याने ब्रॉयलर कोंबड्यांची बिर्याणी, तंदूर व करीसाठी मागणी जास्त असते. भैरवनाथ कोंबड्यांचे मागणीही कमी झाली आहे. गावराणी कोंबड्यांची मागणी तशीही कमीच असते.

10 percent increase in prices of fruits vegetables prices of leafy vegetables stable
फळभाज्यांच्या दरात १० टक्के वाढ, पालेभाज्यांचे दर स्थिर
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

कोंबड्या विकल्या जात नाहीत. मात्र त्यांचे पालन-पोषण करण्याचा खर्च सुरूच आहे. एका कोंबडीला दर दिवशी पाच रुपयाचे खाद्य लागते. चाळीस दिवसात तयार होणाऱ्या ब्रॉयलर कोंबडीला दहा दिवस अधिक  पोसावे लागले तरी पन्नास रुपयांचा अतिरिक्त खर्च येतो. ठोक बाजारात १०५ रुपये किलो विकल्या जाणाऱ्या या कोंबडीवर पन्नास रुपयाचा अतिरिक्त खर्च म्हणजे मोठाच आर्थिक फटका  होय, असे मत वर्धेतील नुराणी चिकन्सचे तौफिक नुराणी यांनी व्यक्त केले. विदर्भभर कोंबडी विक्री तसेच खाद्य विक्री करणारे अमरावतीच्या आगत हॅचरिजचे सुनील झोंबाडे म्हणाले, कोंबडीचे खाद्य चांगलेच महागले आहे. गतवर्षी चाळीस रुपये किलोने मिळणारी सोयाबीन ढेप आज १०५ रुपये किलो झाली आहे. कोंबड्याच्या भावात मात्र घसरणच सुरू आहे. म्हणून तेलंगणातील बाजारात विदर्भातील कोंबड्यांची विक्री करावी लागत आहे. गत तीन दिवसात पंधरा ट्रक कोंबड्यांची विक्री तेलंगणात करण्यात आली. मराठवाड्यातून येणाऱ्या गावराणी कोंबड्यांचे दरही १६० रुपये प्रती किलोवरून १२० रुपये किलोपर्यंत घसरल्याचे झोंबाडे यांनी सांगितले. बिर्याणी सेंटर ओएसिसचे मालक अमिर अली अजानी म्हणाले, हॉटेलमध्ये या काळात मांसाहार करणाऱ्यांची  गर्दी आहे. दोन दिवसापूर्वीच्या चतुर्थीलाही शहरातील चारही बिर्याणी सेंटरमध्ये गर्दी  होती. पुढील काही दिवसात कोंबडी बाजारात गर्दी लोटण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.